न्यूयॉर्क । क्ले कोर्टचा किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने हार्ड कोर्टवर विक्रमी कामगिरी करत तिसऱ्या अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. काल येथे झालेल्या अंतिम फेरीत नदालने समवयस्क रशियाच्या केविन अँडरसनवर६-३, ६-३- ६-४ अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
याबरोबर या खेळाडूने असा एक खास विक्रम केला आहे ज्यामुळे टेनिस चाहते नक्कीच आश्चर्यचकित होतील. टेनिस जगतात विजेतेपदातून मिळणारी कारकिर्दीतील रक्कम ही नदालची आता $९० मिलियनच्या पुढे गेली आहे. अशी कामगिरी करणार तो टेनिस जगतातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांनी ही कामगिरी केली आहे.
जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचने कारकिर्दीत १०९.८ मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे तर फेडररने १०७.७ मिलियन अमेरिकन डॉलर किरकीर्दीत बक्षिसातून कमावले आहे.
यूएस ओपनपूर्वी नदालच्या नावावर यूएस ओपन ८६.३ मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई होती. परंतु येथे विजेतेपद मिळाल्यामुळे नदालला तब्बल ३.७ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाले आणि त्याचे एकूण कमी ही रक्कम ९० मिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे.