---Advertisement---

तू अशी जवळी रहा! विराटने शेअर केला ‘कपल पिक्चर’

---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत म्हटले आहे की, जेव्हाही अनुष्का त्याच्यासोबत असते, तेव्हा त्याला कुठेही घरी असल्यासारखे वाटत असते. भारतीय कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी नेटमध्ये खूप मेहनत घेत आहे. यूएईमध्ये टी२० विश्वचषक २०२१ संपल्यानंतर विराट कोहलीने थोडा ब्रेक घेतला होता. नुकताच त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘जेव्हाही अनुष्का त्याच्यासोबत असते, तेव्हा त्याला घरी असल्यासारखे वाटत असते. या फोटोत हे जोडपे तलावाजवळ बसून सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. या फोटोला काही मिनिटांत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवली आहे. फोटोमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका सुंदर ठिकाणी शांतपणे बसलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करत कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तू माझ्यासोबत असते, तेव्हा मला कुठेही घरी असल्यासारखे वाटत असते.’ यावर अनुष्कानेही मजेशीर उत्तर दिले आहे. तिने लिहिले की, ‘ ही चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही घरी असतातच कधी.’ या पोस्टला ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात १० लाखाहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

नियमित कसोटी कर्णधार विराट सध्या कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी मैदानाबाहेर आहे. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वानखेडेवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तो संघात सामील होणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कानपूर कसोटीत नेतृत्व करत आहे. विराट कोहलीने टी२० विश्वचषक २०२१ नंतर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे त्याला पहिल्या कसोटीसाठी आणि टी२० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---