वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) 2025 मध्ये आजचा दुसरा सामना रत्नागिरी जेट्स आणि रायगड रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते रत्नागिरी जेट्सच्या जलदगती गोलंदाज प्रियांका घोडकेने. तिनं अवघ्या 3.4 षटकांत 10 धावा देत 5 बळी घेतले. या अद्भूत कामगिरीसह तिनं या स्पर्धेतील पहिलं “फायव्ह विकेट हॉल” आपल्या नावावर केलं.
रायगड रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. राॅयल्सची सुरुवात चांगली झाली होती. किरण नवगिरेने फक्त 20 चेंडूंमध्ये 37 धावा ठोकल्या. आदिती गायकवाडने 23 धावांची संयमी खेळी केली. पण नंतर प्रियांका घोडकेने जबरदस्त मारा करत रायगडचा डाव 106 धावांत गुंडाळला. तिने आपल्या 3.4 षटकांत 5 बळी घेतले. तिच्या या पराक्रमी कामगिरीला भक्ती मिरजकरनेही चांगली साथ दिली. तिनं 4 षटकांत 15 धावा देत 2 बळी घेतले. मंधानाच्या अनुपस्थितीत गाैतमी नाईक रत्नागिरी जेट्स संघाचं कर्णधारपद सांभळत आहे.
आता रत्नागिरी जेट्सला विजयासाठी 107 धावांची गरज आहे. प्रियांका घोडकेच्या या भेदक गोलंदाजीमुळे सामना रत्नागिरीच्या हातात गेला आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही.
स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर हे दोन्ही संघ अंतिम सामन्यातून बाहेर पडले आहेत. सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध पुणे वाॅरियर्स हे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहेत.
रत्नागिरी जेट्स – प्लेइंग इलेव्हन:
गौतमी नाईक (कर्णधार), शिवाली शिंदे, प्रियांका घोडके, संजना वाघमोडे, भक्ती मिरजकर, अनुश्री स्वामी, रसिका शिंदे, ज्ञानेश्वरी पाटील, ज्ञानदा निकम, तेजश्री नानावरे, तेजस्विनी बटवाल.





