महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्याच वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगला (WMPL 2025) लवकरच सुरुवात होणार आहे. MCA अध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमार्फत खेळवली जाणारी ही देशातील पहिली महिला टी20 लीग आहे. ही स्पर्धा येत्या 5 जूनपासून रंगणार असून राज्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होत आहेत. सोलापूर स्मॅशर्स, रायगड रॉयल्स, रत्नागिरी जेट्स आणि पुणे वॉरियर्स यांचा समावेश आहे. स्पर्धेत एकूण 13 लीग सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना 14 जून रोजी रंगणार आहे.
स्पर्धा सुरु होण्याआधीच सर्व संघांनी कसून तयारी सुरू केली असून पहिलेच जेतेपद पटकावण्यासाठी संघ सज्ज झाले आहेत. चला तर मग, या बातमीद्वारे पुणे वॉरियर्स संघाचं संपूर्ण वेळापत्रक पाहुयात:
WMPL 2025 साठी पुणे वॅारियर्स संघाचे वेळापत्रक WMPL 2025: Full Schedule of Pune Warriors )
विरुद्ध, सोलापूर स्मॅशर्स 5 जून, सकाळी 9.30 वाजता
विरुद्ध, रायगड रॅायल्स 6 जून, सकाळी 9.30 वाजता
विरुद्ध, रत्नागिरी जेट्स 8 जून, दुपारी 2 वाजता
विरुद्ध, रायगड रॅायल्स, 9 जून, संध्याकाळी 7 वाजता
विरुद्ध, रत्नागिरी जेट्स, 11 जून, सकाळी 9.30 वाजता
विरुद्ध, सोलापूर स्मॅशर्स, 12 जून, सकाळी 9.30 वाजता
स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश-
या लीगमधील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सामने विनामुल्य (मोफत प्रवेश) आहेत. त्यामुळे सर्वांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. शिवाय एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणात लोकांनी मैदानात येऊन सामने पहावे आणि आपल्या आपल्या संघाला पाठिंबा द्यावा, असे अव्हानं केले आहे. (Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry)
थेट प्रक्षेपणाची सोय-
हे सर्व सामने JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर आणि Star Sports 2 या टीव्ही वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही रोमांचक स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioHotstar )






