---Advertisement---

WMPL 2025: पुणे वाॅरियर्सची विजयी घोडदौड सुरुच, रत्नागिरीचं आव्हान संपुष्टात

On: बुधवार, जून 11, 2025 1:31 PM
---Advertisement---

वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या WMPL 2025 पहिल्या हंगामातील नववा सामना आज पुणे वाॅरियर्स आणि रत्नागिरी जेट्स यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना रत्नागिरी जेट्ससाठी करो किंवा मरो होता. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रत्नागिरी संघाला या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. पुणे वाॅरियर्सने हा सामना 6 विकेट्सनी जिंकत स्पर्धेतील आपला सलग पाचवा विजय साजरा केला. तर रत्नागिरीला पाच सामन्यातील हा चाैथा पराभव स्वीकारवा लागला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्सने 20 षटकांत केवळ 6 बाद 122 धावा केल्या. सलामीवीर शिवाली शिंदेने सर्वाधिक 58 धावा (49 चेंडू) केल्या, तर गौतमी नाईकने 15 धावांची खेळी केली. पुणेच्या गोलंदाजीत चिन्मयी बोरफळेने 4 षटकांत केवळ 10 धावा देत 1 बळी घेतला, तर ईशिता खालेनेही 4 षटकांत 13 धावांत 1 विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना, पुणे वाॅरियर्सने 18.2 षटकांत 4 विकेट्स गमावून 113 धावा करत सामना आपल्या खिशात घातला. ज्यामध्ये श्वेता सावंतने 30 धावा (29 चेंडू) तर अक्षया जाधवने नाबाद 29 धावा (36 चेंडू) करत विजयात मोलाचा वाटा उचलला. रत्नागिरीकडून भक्ती मिरजकरने भेदक मारा करत 4 षटकांत केवळ 7 धावा देत 2 बळी घेतले, तर प्रियांका घोडकेने 2 विकेट्स घेतल्या. पण या दोघीही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

या विजयानंतर पुणे वाॅरियर्सचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर मजबूत स्थितीत आहे. संघाने याआधीच अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवली आहे. दुसरीकडे, रत्नागिरी जेट्सचा प्लेऑफ्समधील प्रवास जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---