---Advertisement---

WMPL 2025: पुणे वॅारियर्सची विजयी सलामी, सोलापूरच्या पदरी निराशा

On: गुरूवार, जून 5, 2025 1:33 PM
---Advertisement---

WMPL 2025: डब्ल्यूएमपीएलच्या पहिल्याच हंगामातील पहिल्या सामन्यात पुणे वाॅरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स संघ भिडले. हा सामना पुण्यातील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर खेळला गेला. ज्यामध्ये पुणे वॉरियर्सने सोलापूर स्मॅशर्सचा 5 गडी राखून पराभव करत महत्त्वपूर्ण विजय मिळवला. अटीतटीच्या या सामन्यात पुणे संघाने अखेर मैदानात मारले.

सोलापूर स्मॅशर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 139 धावा केल्या. त्यांच्या डावात तेजल हासनबीसने सर्वाधिक 69 धावा (54 चेंडूत) करत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तिच्या साथीला मुक्ता मगरेने संयमी खेळी करत 46 चेंडूत 36 धावा केल्या. पुणे वॉरियर्सकडून खुशी मुल्लाने प्रभावी गोलंदाजी करत 4 षटकांत 19 धावा देऊन 2 गडी बाद केले, तर अंनुजा पाटीलने 4 षटकांत 22 धावा देत 1 बळी मिळवला.

प्रत्युत्तरात विजयासाठी 140 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे वॉरियर्सने ठाम आणि संयमित खेळ करत 19.4 षटकांत विजय मिळवला. पुण्याच्या डावात श्वेता सावंतने सर्वाधिक 38 धावा करत संघाला मजबूत सुरूवात दिली. सुहानी कहांडळनेही दमदार खेळी करत 36 महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. श्वेताने कर्णधार अनुजा पाटील सोबत मोलाची भागिदारी रचल (63 धावा 46 चेंडू) ज्यामुळे पुण्याचा विजय सुलभ झाला. अनुजा पाटीलनेही 30 धावांची मोलाची खेळी खेळली. सोलापूर स्मॅशर्सकडून ईश्वरी अवसारेनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

हा विजय पुणे वॉरियर्ससाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला असून, स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीला बळकटी मिळण्यासाठी आणखी सोपे होईल. या रोमांचक सामन्यात शेवटी वैष्णवी शिंदेने चाैकार खेचत सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---