इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2020 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला असतानाच दुसरीकडे युएई येथे महिला टी20 चॅलेंज स्पर्धा सुरू होत आहे. यातील पहिला सामना बुधवारी (4 नोव्हेंबर) शारजाह येथे सायंकाळी 7.30 वाजता हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज आणि मिताली राज हिच्या वेलॉसिटी या दोन संघात होणार आहे.
मागील हंगामात सुपरनोव्हासने दोन्ही वेळा मिळवला विजय
यापूर्वी 2019 मध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमने-सामने आले होते. लीग सामन्यात सुपरनोव्हासने वेलॉसिटीचा 12 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, दोन संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात, सुपरनोव्हासने वेलॉसिटीविरुद्ध 4 गडी राखून विजय मिळविला होता.
रॉड्रिगेज आणि हरमनप्रीत यांनी सुपरनोव्हासमध्ये केल्या सर्वाधिक धावा
सुपरनोव्हासकडून सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स प्रथम आणि भारतीय महिला टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर दुसर्या स्थानावर आहे. रॉड्रिग्जने 3 सामन्यात सर्वाधिक 123 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हरमनप्रीतने 3 सामन्यात 98 धावा केल्या आहेत.
अनुजा आणि राधाने सर्वाधिक बळी टिपले
सुपरनोव्हासमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत फिरकीपटू अनुजा पाटील आणि मध्यमगती वेगवान गोलंदाज राधा यादव प्रत्येकी 3-3 बळींसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर पूनम यादव 2 बळींसह दुसर्या क्रमांकावर आहे.
वेलॉसिटीकडून व्हाईट आणि मितालीने केल्या सर्वाधिक धावा
वेलॉसिटीमध्ये डॅनिएल व्हाईटने आपल्या संघासाठी 3 सामन्यांमध्ये सर्वाधिक 89 धावा केल्या आहेत. यानंतर कर्णधार मिलाती राजचा क्रमांक येतो.तिने 3 सामन्यात 69 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर शेफाली वर्मा 47 धावा काढून तिसर्या स्थानावर आहे.
केर आणि शिखा यांनी घेतले सर्वाधिक बळी
वेलॉसिटीकडून सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत न्यूझीलंडची गोलंदाज अमेलिया केर आणि भारतीय गोलंदाज शिखा पांडे दुसर्या क्रमांकावर आहेत. केरने 3 सामन्यात 6 बळी घेतले. त्याचबरोबर शिखाने 3 सामन्यांत 2 बळी घेतले आहेत.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती
शारजाहध्ये आकाश स्वच्छ राहील. तापमान 22 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. आयपीएल 2020 च्या आधी येथे झालेल्या 13 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 69% आहे.
आयपीएलच्या हंगामापूर्वी झालेले टी20 सामने: 13
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 9
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 4
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 149
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 131
मागील दोन्ही हंगामात सुपरनोव्हासने मिळवला विजय
हरमनप्रीतचा संघ सुपरनोव्हासने गेल्या दोन्ही हंगामात (2018, 2019) विजेतेपद जिंकले होते. गेल्या हंगामात हरमनप्रीत स्वतः या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होती. तिने तीन सामन्यात दोन अर्धशतके झळकावली होती. त्याच वेळी, वेलॉसिटीने मागील हंगामात अंतिम फेरी गाठली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने
-‘ही’ प्रसिद्ध कंपनी बनली महिला आयपीएलची टायटल स्पॉन्सर, बीसीसीआयने केली घोषणा
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का