मुंबई। मंगळवारी, 22 मेला महिलांच्या आयपीएलचा प्रदर्शनीय सामना होणार आहे. हा सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवास संघात होणार आहे.
ट्रेलब्लेझर्सचा संघ स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळेल, तर सुपरनोवास संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे.
हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. या सामन्यात सुपरनोवास संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन संघांकडून भारताबरोबरच आॅस्ट्रेलिया, न्युझीलंड तसेच इंग्लंडच्या महिला खेळाडूही खेळताना दिसतील.
मागच्या वर्षी झालेल्या महिलांच्या विश्वचषकाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा पाठिंबा लाभला होता. याचमुळे बीसीसीआयने महिला खेळाडूंसाठी या खास सामन्याचे आयोजन केले आहे.
असे आहे 11 जणींचा संघ:
ट्रेलब्लेझर्स- अायसा हेली (यष्टीरक्षक), स्म्रिती मानधना (कर्णधार), सुझी बेट्स, दिप्ती शर्मा, जेमीमी रोड्रीग्ज, बेथ मुनी, डॅनियल हेजल, शिखा पांडे,ली ताहूहु, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, प्रशिक्षक- तुषार आरोटे
सुपरनोवाज- डॅनियल वॅट, मिताली राज, मेग लेनिंज्स, हरमनप्रित कौर (कर्णधार), सोफी डेविन, एलिस पेरी, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेश्राम, पुजा वस्त्राकर, मेगन कट्स, तानिया भाटिया (यष्टीरक्षक). प्रशिक्षक- विजु जाॅर्ज
महत्त्वाच्या बातम्या-
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष