जगभरातील प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची गणना होते. आयपीएलनंतर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग स्पर्धेचीही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत कोणते संघ खेळणार हे देखील ठरले आहे. तसेच, 5 फ्रँचायझी आणि त्यांच्या मालकांच्या नावाचाही खुलासा झाला आहे. आता फक्त खेळाडूंचा लिलाव होणे बाकी आहे. भारत आणि जगभरातील महिला खेळाडू कोणकोणत्या संघाकडून खेळतील याबाबत माहिती समोर आली नाहीये. असे असले, तरीही माध्यमांतील वृत्तांनुसार, डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन हंगामातील पहिला सामना कधी, कुठे आणि कोणत्या संघांमध्ये होणार आहे, याची घोषणा झाली आहे.
अंबानी- अदानी यांच्या संघांमध्ये होणार पहिला सामना
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील पहिला सामना मुंबई विरुद्ध अहमदाबाद (Mumbai vs Ahmedabad) संघात होणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा सामना पुढील महिन्यात म्हणजेच 4 मार्च रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या लीगचा पहिला हंगाम एकूण 23 दिवस चालेल. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी खेळला जाईल. बीसीसीआयने या लीगच्या वेळापत्रकाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये, पण माध्यमांतील वृत्तांनुसार, स्पर्धेचा पहिला सामना 4 मार्च रोजी मुंबई विरुद्ध गुजरात जायंट्स (Mumbai vs Gujarat Giants) (अहमदाबाद) संघात होणार आहे.
खरं तर, मुंबई संघाची मालकी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याकडे आहे. तसेच, अहमदाबाद संघाची मालकी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याकडे आहे. या सामन्यात भारताचे हे दोन मोठे व्यावसायिक अप्रत्यक्षरीत्या आमने-सामने असणार आहेत.
बीसीसीआय (BCCI) महिला प्रीमिअर लीगची सुरुवात डी. वाय. पाटील स्टेडिअममधून सुरू करण्याची योजना आखत आहे. ही लीग मुंबईच्या सीसीआय (ब्रेबॉर्न स्टेडिअम) आणि डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये आयोजित केली जाऊ शकते. वानखेडे स्टेडिअममध्ये महिला आयपीएलचे सामने होणार नाहीत. कारण, भारताचा पुरुष संघ मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मैदानावर एक वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजनदेखील याच मैदानावर होतील. आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघदेखील याच मैदानावर सराव करेल.
या स्पर्धेतील दुसरा सामना पाच मार्च रोजी सीसीआय मैदानात बंगळुरू विरुद्ध दिल्ली संघात खेळला जाऊ शकतो.
स्पर्धेत असेल फक्त एक एलिमिनेटर सामना
माध्यमांतील वृत्तांनुसार, पाचपैकी 3 संघा प्लेऑफमध्ये पोहोचतील. गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या संघाला थेट अंतिम सामन्यात जागा मिळेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ एलिमिनेटर सामने खेळतील. इथे विजय मिळवणारा संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानी असणाऱ्या संघाविरुद्ध खेळेल. या लीगमध्ये एकूण 22 सामने होतील. 23 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 5 दिवस असे असतील, जिथे एकही सामना होणार नाही. ते दिवस म्हणजे 17, 19, 22, 23 आणि 25 मार्च होय. 21 मार्च रोजी साखळी सामने संपतील. त्यानंतर 24 मार्च रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाईल आणि 26 मार्च रोजी अंतिम सामना पार पडेल. (women premier league 2023 schedule venue announced first match mumbai vs gujarat giants know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सानिया मिर्झानंतर शोएब मलिकही घेतोय निवृत्ती? मैदानात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’
कसोटी क्रिकेट लवकरच होणार मोठा बदल, लाल चेंडूने खेळताना येत आहेत अडचणी