2024 महिला टी20 विश्वचषकात रविवारी (13 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. कांगारुंनी टीम इंडियाचा 9 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानवर अवलंबून बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना गमावल्यानंतर टीम इंडियाच्या हाती काहीच उरलं नाही.
भारतीय संघ विश्वचषकाच्या ‘अ’ गटात आहे. या गटात एकूण 5 संघ आहेत, ज्यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड वगळता सर्व संघांनी 4-4 सामने खेळले आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड 14 ऑक्टोबरला म्हणजेच आज (सोमवार) एकमेकांविरुद्ध शेवटचा सामना खेळतील. भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तानपैकी कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, हे या सामन्यातून ठरेल. हे समीकरण काय आहे? ते या बातमीद्वारे जाणून घेऊया.
पाकिस्ताननं आतापर्यंत तीनपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत जर पाकिस्ताननं शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, तर भारत आणि न्यूझीलंडप्रमाणे त्यांचेही दोन विजयांसह 4 गुण होतील. अशाप्रकारे, चांगला नेट रनरेट असलेले दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. न्यूझीलंडनं आतापर्यंत ग्रुप स्टेजमधील तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, तर किवी संघ कोणावरही अवलंबून न राहता थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
महिला टी20 विश्वचषकात टीम इंडियानं आपले चारही साखळी सामने खेळले. भारतानं स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा 58 धावांनी पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्ध 6 विकेटनं तर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 82 धावांनी विजय मिळवला. मात्र, त्यानंतर ग्रुप स्टेजच्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा –
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य! म्हणाले, “भारतीय संघातील…”
सचिन-द्रविडचा ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड, जो कोणताही फलंदाज मोडण्याचे स्पप्नही नाही पाहणार
आश्चर्यकारक! IND vs NZ; कसोटी सामन्यात ‘या’ खेळाडूने ठोकलेत सर्वाधिक षटकार!