आयसीसी महिला टी20 विश्वचषकाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी संघांच्या तयारीसाठी काही सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानचा संघ मोठ्या अपसेटचा बळी ठरला आहे.
पहिला टी20 विश्वचषक खेळणाऱ्या स्क्वॉडलँडच्या संघानं सराव सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला. स्कॉटलंडनं हा सामना 8 विकेट्स आणि दोन षटक शिल्लक राखून जिंकला. टी20 विश्वचषकापूर्वी अशा पराभवामुळे पाकिस्तानच्या आत्मविश्वासाला नक्कीच धक्का बसला असेल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान संघानं 20 षटकांत 9 गडी गमावून 132 धावा केल्या. संघाची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली. यानंतर मुनिबा अली आणि ओमामा सोहेल या जोडीनं पाकिस्तानला या धावसंख्येपर्यंत नेलं. यष्टिरक्षक फलंदाज मुनिबानं 27 तर ओमामानं 30 धावा केल्या.
133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघाला सलामीच्या फलंदाज सस्किया हॉर्ले आणि सारा ब्राइस यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 11.3 षटकांत 73 धावांची भागीदारी झाली. हॉर्लेनं 48 तर सारानं 60 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या सारा ब्राइसनं कर्णधार कॅथरीन ब्राइससह दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेलं. सारा शेवटपर्यंत नाबाद राहिली.
भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज 29 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. भारतीय स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा सारख्या स्टार खेळाडू आहेत. याशिवाय दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा आणि यास्तिका भाटिया यांनाही संघात स्थान मिळालंय. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, शोभना आणि सजीवन या संघात आहेत. तर राधा यादव, दयालन हेमलता आणि अरुंधती रेड्डी यांनाही संधी मिळाली आहे.
हेही वाचा –
3 दुर्दैवी खेळाडू, ज्यांना बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही
राहुल द्रविडच्या मुलानंतर आणखी एका दिग्गजाच्या मुलाचा अंडर 19 संघात समावेश
आयपीएल 2025 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम असणार की नाही? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं