भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई स्पर्धेतून बाहेर झाली आहे. रविवारी (13 ऑगस्ट) रोजी सरावा दरम्यान विनेशच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. तिच्या जागी ज्युनियर विश्वविजेती अंतिम पंघल आशियाई क्रीडा स्पर्धेतील 53 किलो वजनी गटात भाग घेणार आहे. विनेशने आपल्या ट्विटर पोस्ट करत ही माहिती दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशला थेट प्रवेश मिळाला होता. तर, अंतिम पात्रता फेरीची विजेती होती.
विनेशने ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. विनेशने लिहिले की, मी निराश आहे की मी माझ्या विजेतेपदाचे रक्षण करू शकणार नाही. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी करता यावी यासाठी आपण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून देखील माघार घेत असल्याचे म्हटले.
मागील वेळी जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये तिने सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात ती अग्रक्रमाने सहभागी झालेली.
(Women Wrestler Vinesh Phogat Ruled Out From Asian Games Antim Panghal Will Play)
महत्वाच्या बातम्या –
रांचीत हॉन्डा रॅपसॉल घेऊन फिरतोय एमएस धोनी, नवा व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs AUS । विश्वचषकापूर्वी कमिन्स करणार मैदानात पुनरागमन, शेवटच्या ऍशेस कसोटीत झालेली दुखापत