महिला आशिया चषक 2022 चा दुसरा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सिल्हेट येथे खेळला गेला. जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताच्या सर्वच गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव सर्वबाद 109 पर्यंत रोखला. परिणामी, भारतीय संघाने 41 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात चांगली केली. सामनावीर पुरस्कार जेमिमाला देण्यात आला.
WOMEN'S ASIA CUP. India Women Won by 41 Run(s) https://t.co/3iXm09LDTo #INDvSL #AsiaCup2022
— BCCI Women (@BCCIWomen) October 1, 2022
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. सुरूवातीलाच भारताचा संघ अडखळला. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्या. दोघींनी अनुक्रमे 10 आणि 6 धावा केल्या. त्यानंतर पुनरागमन करत असलेली जेमिमा व कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीने 71 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत 30 चेंडूत 33 धावा करत बाद झाली. तसेच जेमिमाने 53 चेंडूत 76 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी थोडेफार योगदान दिल्याने भारतीय संघाने 7 बाद 109 अशी मजल मारली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाने धावांचा वेग राखला मात्र त्यांना आपले बळी टिकवता आले नाहीत. नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा संघ संकटात सापडला. हसिनी परेरा (30), हर्षिता मडवी (26) आणि ओशाडी रणसिंघे (11) यांच्या व्यतिरिक्त कोणीही दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. परिणामी त्यांचा संघ केवळ 109 धावांवर तंबूत परतला. भारतासाठी डी हेमलताने सर्वाधिक तीन, पूजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. भारताचा पुढील सामना 3 ऑक्टोबर रोजी मलेशियाविरूद्ध खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची ‘फिफ्टी’, भारताचे श्रीलंकेसमोर 151 धावांचे लक्ष्य
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल