---Advertisement---

विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लोळायला लागली, महिला खेळाडूचं हे कसलं अनोखं सेलिब्रेशन!

On: शुक्रवार, ऑगस्ट 30, 2024 11:30 AM
---Advertisement---

बार्बाडोस रॉयल्सनं महिला कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 (WCPL) चं विजेतेपद पटकावलंय. 29 ऑगस्ट रोजी बार्बाडोस रॉयल्स आणि त्रिनबागो नाइट रायडर्स यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये बार्बाडोस रॉयल्सनं 4 गडी राखून विजय मिळवला.

फायनलमध्ये एलियाह ॲलेनला सामनावीर पुरस्कारानं गौरविण्यात आलं. तिनं 4 षटकांत 21 धावा देत 4 बळी घेतले. त्रिनबागो नाईट रायडर्सनं 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 93 धावा केल्या होत्या. बार्बाडोस रॉयल्सनं 94 धावांचं लक्ष्य 6 गडी गमावून गाठलं.

या सामन्यात जेनेलिया ग्लासगोची विकेट घेतल्यानंतर एलियाहनं अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कॅरेबियन महिला क्रिकेटपटूंनी डब्ल्यूसीपीएलमध्ये याआधीही अनोखे सेलिब्रेशन केले आहेत. फायनलमधील सेलिब्रेशन हे त्यापैकीच एक होतं. जेनेलियानं 31 चेंडूत 24 धावा केल्या. अमांडा जेड वेलिंग्टननं एलियाहच्या चेंडूवर तिचा झेल घेतला, ज्यानंतर एलियाहनं उर्वरित संघासह ही विकेट अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली. तुम्ही या सेलिब्रेशनचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

ग्लासगोशिवाय एलियाहनं शिखा पांडे, चेडिन नेशन आणि जेदा जेम्स यांची विकेट घेतली. शिखा पांडेनं 31 चेंडूत सर्वाधिक 28 धावांची खेळी खेळली. कर्णधार हेली मॅथ्यूजनं दोन बळी घेतले. बार्बाडोस रॉयल्सनं 15 षटकांत 6 गडी गमावून 94 धावा करत विजेतेपद पटकावलं. चामारी अटापट्टूनं 47 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी खेळली. समारा रामनाथनं 4 षटकांत 18 धावा देत दोन बळी घेतले. तर शिखा पांडे, जेस जोनासेन आणि अनीसा मोहम्मद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

95 धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोस रॉयल्सचा डावही अडखळला होता. मात्र चामारी अटापट्टू हिनं एक टोक सांभाळून ठेवत संघाला विजय मिळवून दिलं. बार्बाडोस रॉयल्सनं सलग दुसऱ्यांदा WPL विजेतेपद पटकावलं आहे, WPL चा पहिला सीझन 2022 मध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सनं विजेतेपद पटकावलं होतं.

हेही वाचा – 

यूएस ओपनमध्ये खूप मोठा उलटफेर! दिग्गज कार्लोस अल्कारेज बिगरमानंकित खेळाडूकडून पराभूत होऊन बाहेर
ऑलराउंडर रिंकू! आधी बॅटनं केला कहर, मग चेंडूनं बदलून टाकली संपूर्ण मॅच
कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणं सर्वात कठीण जातं? जसप्रीत बुमराहनं दिलं अनोखं उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---