भारत देशात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे अगदी अबालवृद्धही क्रिकेटसाठी वेडे असतात. त्यातही भारताने १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर येथील लोकांमध्ये क्रिकेटप्रती प्रेम अधिकच वाढतच गेले. परिणामी आज भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात क्रिकेट अकादमी आहेत. अशी एक क्रिकेट अकादमी मध्य प्रदेश राज्यातील शिवपुरी जिल्ह्यात (Cricket Academy In Shivpuri) स्थापित केली जाणार आहे.
ही अकादमी केवळ महिला क्रिकेटपटूंसाठी (Women’s Cricket Academy) असणार असल्याने त्याचे विशेष कौतुक होते आहे. मध्य प्रदेशच्या क्रिडा आणि युवा कल्याण मंत्री (mp sports and youth welfare department) यशोधरा राजे सिंधिया (Yashodhara Raje Scindia) हा निर्णय घेतला आहे.
या वृत्तासंबंधी अधिकृत माहिती देताना सांगितले गेले आहे की, मध्य प्रदेशच्या खेळ मंत्री सिंधिया यांनी युवा क्रिकेटप्रेमी मुलींसाठी महिला क्रिकेट अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ही देशातील पहिला शासकिय महिला क्रिकेट अकादमी असेल. मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही अकादमी उभारली जाईल. तर एकंदर ही मध्य प्रदेशातील अकरावी अकादमी असेल.
मध्य प्रदेशात आतापर्यंत वेगवेगळ्या खेळांसाठी अकादमी आहेत. येथे ऍथलेटिक्स, शूटिंग, घोडेस्वारी, पाण्यातील खेळ, मार्शल आर्ट, पुरुष हॉकी, महिला हॉकी, बॅडमिंटन, तिरंदाजी आणि पुरुष क्रिकेट अकादमी आहेत.
मध्यप्रदेश राज्य महिला क्रिकेट अकादमीसाठी २८ फेब्रुवारीपासून टॅलेंट सर्चची सुरुवात होईल. यामध्ये १४ ते २१ वर्षांच्या खेळाडूंचा समावेश असेल. या अकादमीसाठी पहिला टॅलेंट सर्च २८ फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी इंदोर येथे होईल. यामध्ये इंदोर आणि उज्जेन विभागांतील सर्व जिल्ह्यातील महिला खेळाडूंचा समावेश असेल. तर भोपाल, नर्मदापुरम आणि सागर संभाग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भोपालमध्ये २ किंवा ३ टॅलेंट सर्च होतील. जबलपूर विभागातील जिल्ह्यांसाठी जबलपूरमध्ये ४ किंवा ५ मार्च तसेच ग्वालियर किंवा चम्बल विभागातील जिल्ह्यांसाठी शिवपुरी येथे ७ किंवा ८ मार्च रोजी टॅलेंट सर्च होईल.
क्रिडा विभागाद्वारे अकादमीतील सर्व निवड झालेल्या खेळाडूंची शिक्षा, निवास, भोजन, प्रशिक्षण किट यांसारख्या सुविधा विनाशुक्ल उपलब्ध करून दिल्या जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय
बुमराहला मागे टाकत चहल बनला भारताचा टी२० तील ‘नंबर वन’ गोलंदाज! वाचा काय केलाय पराक्रम