बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ जून- जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. जिथे दोन्ही संघात पाच टी20 आणि 3 वनडे सामने खेळले जातील. दोन्ही मालिकेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तसेच दोन्ही मालिकेसाठी स्मृती मानधना उपकर्णधार पद भूषवणार आहे.
निवडकर्त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माला फक्त टी-20 संघात स्थान दिले आहे. शेफाली वर्माने ऑक्टोबर 2024 नंतर कोणताही वनडे आंतराष्ट्रीय सामना खेळला नाही. तसेच रिचा घोष, यास्तिका भाटिया आणि हरलीन देऊन यांना दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे.
डब्ल्यूपीएलमध्ये गुजरातसाठी खेळणारी 22 वर्षीय काशवी गौतमला संघातून बाहेर करण्यात आले आहे. तिच्या जागी वेगवान गोलंदाज सयाली सतघरेचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप-कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, तेजल हसब्निस, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधति रेड्डी, क्रांति गौड़, सयाली सतघरे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधति रेड्डी, क्रांति गौड़, सयाली सतघरे.






