लंडन। महिला हॉकी विश्वचषक 2018 मधील फोटोशूटसाठी ठेवलेल्या भारतीय झेंड्यामध्ये अशोक चक्र नव्हते. उद्यापासून(21जुलै) महिला हॉकी विश्वचषक लंडन येथे सुरू होत आहे.
यासाठी 16 सहभागी संघाच्या कर्णधारांचे त्यांच्या देशांच्या झेंड्यासोबतचे फोटोशूट थेम्स नदीच्या किनाऱ्यावर करण्यात आले. मात्र यात खूप मोठी चूक झाली ती अशी की, भारतीय झेंड्यामध्ये अशोक चक्रच नव्हते.
ही गोष्ट आयोजकांच्या लवकर लक्षात नाही आली. पण जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांनी लगेचच दुसरा झेंडा आणून परत फोटोशूट करण्यात आले.
भारतीय महिलांचा संघ सातव्यांदा विश्वचषकात खेळणार आहे. 1974 च्या विश्वचषकात ते चौथ्या स्थानावर होते. ही त्यांची उत्कृष्ट कामगिरी ठरली.
Great morning interviewing this bunch by the #Thames in #London
Stay tuned for the official photos from @Vitality_UK and the @FIH_Hockey #hockeyworldnews #hwnews #hockey #worldcup #HWC2018 #Vitality pic.twitter.com/iAQb7MGm8p
— Hockey World News (@hockeyWrldNws) July 18, 2018
झेंडा बदलून परत जे फोटोशूट करण्यात आले त्यांचे ट्विट इंग्लंडने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून केले.
16 nations. 16 captains. 1 Prize. The Vitality #HWC2018! 🏑🌍🏆 Read about the official launch here:https://t.co/v8dziPC6SZ pic.twitter.com/Y0jTCRzL0N
— England Hockey (@EnglandHockey) July 19, 2018
“विश्वचषकात खेळण्याची मजाच काही वेगळी असते. या स्पर्धेत आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू”, असे भारताची कर्णधार राणी रामपालने म्हटले आहे.
21जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे सामने 26 जुलैला आयर्लंड तर 29 जुलैला अमेरिके विरुद्ध होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय हॉकी संघाने उडवला न्युझीलंडचा धुव्वा, पहिल्या कसोटी सामन्यात ४-२ ने विजय
–जागतिक हॉकी क्रमवारीत भारतीय संघाची ५ व्या स्थानी झेप