ओव्हल इनव्हिन्सिबल्सने महिला द हंड्रेड लीगच्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या संघाला साजेशी अशी केली. या हंगामातील पहिल्या सामन्यात ओव्हलने नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा १६ चेंडू आणि ९ गडी राखून पराभव केला. संघाच्या विजयात लॉरेन विनफिल्ड-हिलचा मोलाचा वाटा होता. १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तीने अवघ्या ४२ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या. लॉरेनशिवाय, ओव्हलच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी आणखी एक खेळाडू म्हणजे इंग्लंडची युवा अष्टपैलू खेळाडू ऍलिस कॅप्से. आपल्या वाढदिवशी ऍलिसने नॉर्दर्न सुपरचार्जर्सविरुद्ध शानदार अष्टपैलू खेळ दाखवला.
प्रत्येकी १०० चेंडूंच्या या सामन्यात नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाने प्रथम फलंदाजी करत १४३ धावा केल्या. सुपरचार्जर्सकडून भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक ५१ धावा केल्या. त्याच्याशिवाय एलिसा हिलीने १५ धावा केल्या. शेवटच्या सामन्यात, लॉरा वोलवॉर्टने ३९ चेंडूत ४९ धावांची खेळी खेळून सुपरचार्जर्सला १४३ धावांपर्यंत नेले. मात्र, जेमिमाचे अर्धशतकही सुपरचार्जर्सचा पराभव टाळू शकले नाही.
सुपरचार्जर्सने दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुझी बेट्स आणि लॉरेन विनफिल्ड या सलामीच्या जोडीने ओव्हल संघासाठी धमाकेदार सुरुवात केली. दोघींनी मिळून ६८ चेंडूत १०४ धावा जोडल्या. बेट्स बाद झाल्यानंतर बर्थडे गर्ल कॅप्स मैदानात आली आणि तिने ८ चेंडूत खेळ संपवला. तिने चार चौकारांसह २५ धावा फटकावल्या. सामनावीर पुरस्कार विनफील्डने आपल्या नावे केला.
दिवसातील पुरुषांचा सामना देखील याच दोन संघात झाला होता. त्यामध्ये देखील ओव्हल इनविन्सिबलने विजय मिळवत आपली घौडदौड कायम ठेवली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके
‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट
आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान