पुरूषांच्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पंधरावा हंगाम संपला आहे. तर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महिलांच्या आयपीएलची तयारी करत आहेत. पुढच्या वर्षी मार्च किंवा सप्टेंबर महिन्यात सहा संघांना घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे. तसेच मार्च महिन्यात ही स्पर्धा घेता यावी अशी मागणी आयसीसीलाही (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) केली गेली असल्याचे समजत आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा महिला संघ खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
पहिली महिला टी२० चॅलेंज स्पर्धा २०१८मध्ये खेळली गेली. तेव्हापासून या स्पर्धेत तीन संघांमध्ये चार सामने खेळवले जातात. या स्पर्धेत भारतीय महिलांनी उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे चाहत्यांची महिला आयपीएल सुरू व्हावी ही मागणी खूप आधीपासूनच सुरू आहे. तर पुरूषांचा पहिला आयपीएल हंगाम २००८ मध्ये खेळला गेला होता.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी यापूर्वी लवकरच महिलांचे आयपीएल सुरू करणार असे म्हटले होते. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही स्पर्धा आयोजित करण्याआधी बीसीसीआय त्याच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आहेत. त्याबरोबरच मंडळाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स या क्रिकेट मंडळाशी चर्चा केली असता त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग, महिला बिग बॅश लीग आणि द हंड्रेड या स्पर्धा जुलै ते नोव्हेंबर या महिन्यादरम्यान होतात. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका या खेळाडूंचा अधिक समावेश असतो. त्या खेळाडूंना महिला आयपीएलमध्ये खेळता यावे यासाठी मार्च महिना योग्य आहे.
अशात आगामी महिला आयपीएलमध्ये सहा संघांचा सहभाग असणार आहे. यामध्ये पुरूषांच्या काही आयपीएल संघाने रस दाखवला आहे. यात चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे. चेन्नई बरोबरच कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी देखील महिला संघ विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. चेन्नईने तर मुलींसाठी क्रिकेट अकॅडमीदेखील सुरू केली आहे.
आता नुकतीच महिलांची टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धा झाली. पुण्यात झालेल्या या स्पर्धेला आठ हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्यामुळे भारतात पुरूषांबरोबरच महिलांच्या क्रिकेटचा पण एक चाहता वर्ग तयार होत आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियात सामील होण्याआधी केएल राहुलची बहारिनच्या खेळाडूच्या लग्नात धमाल, Photo होतायेत व्हायरल
भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; आठपैकी दोन सामने होणार अमेरिकेत
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!