---Advertisement---

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! २०२३ मध्ये ‘या’ महिन्यात होणार महिला आयपीएलचे आयोजन

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 8:24 PM
Harmanpreet Kaur and Smriti Mandhana
---Advertisement---

गेल्या ४ वर्षांपासून म्हणजेच २०१८ पासून, बीसीसीआय एकीकडे आयपीएल सुरू दुसरीकडे असताना महिला टी-२० चॅलेंजचे आयोजन करत असते. पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये प्रदर्शनीय सामना झाला. सध्या ही स्पर्धा तीन संघांमध्ये खेळवली जाते. आता मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मार्च २०२३ मध्ये पहिल्या महिला आयपीएलचे आयोजन करण्याची योजना आखली आहे.

यासाठी मंडळाने महिलांच्या दंशांतर्गत सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. सामान्यतः नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत चालणारे महिला वेळापत्रक लहान करण्यात आली आहे. २०२२-२३च्या वरिष्ठ महिला हंगामाची सुरुवात आता ११ ऑक्टोबर रोजी टी-२० स्पर्धेने होईल आणि पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये आंतर-झोनल एकदिवसीय स्पर्धेने समाप्त होईल.

फेब्रुवारी २०२२मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला आयपीएल २०२३मध्ये होणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, “आम्ही पूर्ण महिला आयपीएल घेण्यास तयार आहोत. ते नक्कीच होणार आहे. मला खात्री आहे की पुढील वर्षी म्हणजे २०२३ हा संपूर्ण महिला आयपीएल सुरू करण्यासाठी खूप चांगला काळ असेल.”

गांगुलीनंतर मे महिन्यात, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी पाच किंवा सहा संघांच्या स्पर्धेबद्दल बोलले होते. ते म्हणाले होते की, “मला सहभागी सदस्यांकडून (महिला टी-२० चॅलेंजमध्ये) मिळालेल्या प्रतिसादाने मी रोमांचित झालो आहे. अनेक विद्यमान आयपीएल संघांनी देखील चौकशी करत महिलांची आयपीएल फ्रँचायझी घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.”

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि बार्बाडोस रॉयल्सच्या मालकांनी सार्वजनिकपणे महिला आयपीएल संघाची मालकी घेण्यास इच्छा व्यक्त केले होती. नाइट रायडर्स ग्रुपनेही याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा २०२३मध्ये महिला आयपीएलचा पहिला हंगाम आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमातून अनुभवायला मिळणार अस्सल ‘देशी खो खो’चे नव्या रूपात दर्शन

‘मला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते!’ स्वत: शिखर धवनने प्रकट केली इच्छा

‘एका हंगामात ४०० धावा करूनही संधी मिळत नसेल तर…’, संघनिवडीवरून नितीश राणा निराश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---