सोलापूर, 22 डिसेंबर 2033: सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहज यमलापल्ली हिने काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या जपानच्या हिरोमी आबेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. लात्वियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सिचेविकाने ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीचा 6-4, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. जपानच्या साकी इमामुरा रशियाच्या डारिया कुडाशोवाचे आव्हन 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाने भारताच्या आठव्या मानांकित वैदेही चौधरीचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत उपांत्य फेरीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने रशियाच्या तिसऱ्या मानांकित एकतेरिना काझिओनोवा व एकतेरिना याशिना यांचा 7-6(6), 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले साथ निश्चित केले. दुसऱ्या सामन्यात जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांचा 6-4, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: एकेरी: महिला:
सहजा यमलापल्ली (भारत)[7]वि.वि. हिरोमी आबे (जपान) 6-3, 6-2;
एकतेरिना मकारोवा(रशिया)[2]वि.वि. वैदेही चौधरी (भारत)[8] 6-3, 6-3;
डायना मार्सिचेविका(लात्विया)[6]वि.वि. सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस)[3]6-4, 6-3;
साकी इमामुरा(जपान)वि.वि. डारिया कुडाशोवा 6-3, 6-4;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
हिरोमी आबे(जपान)[4]/साकी इमामुरा(जपान)वि.वि.वैष्णवी आडकर (भारत)/ सहजा यमलापल्ली(भारत)6-4, 6-1;
फुना कोजाकी (जपान)/मिसाकी मात्सुदा(जपान) वि.वि.एकतेरिना काझिओनोवा / एकतेरिना याशिना(रशिया)[3] 7-6(6), 6-0.