महिला टी20 विश्वचषक 2024 चा पहिलाच सामना अतिशय रोमांचक होता. या सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेवर 31 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्याच्या मध्यावर फलंदाजाला मिळालेल्या विचित्र जीवदानाचा फायदा श्रीलंकेच्या संघाला घेता आला नाही. या निर्णयामुळे भर सामन्यात बराच गदारोळ झाला होता. पंचांनी आऊट दिल्यानंतरही खेळाडूला नाबाद घोषित करण्यात आलं होतं.
श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्ताननं स्कोअरबोर्डवर कशा तरी 116 धावा लगावल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेच्या फलंदाजांची अवस्था आणखी बिकट झाली. त्यांच्या लागोपाठ विकेट पडत गेल्या. मधल्या फळीतील फलंदाज नीलाक्षी डी सिल्वानं थोडाफार संघर्ष केला, मात्र जीवदान मिळूनही तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
श्रीलंकेची फलंदाज नीलाक्षी डी सिल्वा 13व्या षटकात क्रीझवर खेळत होती. तिनं नश्रा संधूच्या एका शानदार चेंडूवर मात खाल्ली. तिच्याविरुद्ध एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील झाल, ज्यावर अंपायरनं बोट वर केलं. मात्र नीलाक्षीनं काही वेळानं पुन्हा फलंदाजी सुरू केली, कारण रुमाल घसरल्यामुळे तिला जीवदान मिळालं.
झालं असं की, अंपायरनं आऊट दिल्यानंतर नीलाक्षीनं तिच्या विकेटला विरोध केला. गोलंदाजाचा रुमाल खाली पडल्यामुळे आपल्याला त्रास झाल्याचं तिनं पंचांना सांगितलं. त्यानंतर रिप्ले पाहिला गेला आणि तिला नाबाद दिल्या गेलं. आयसीसीच्या नियमांनुसार, गोलंदाजीच्या वेळी गोलंदाजाची टोपी, रुमाल किंवा कोणतीही विचलित करणारी गोष्ट दिसल्यास त्या चेंडूला ‘डेड बॉल’ घोषित करण्यात येतं. नीलाक्षीला या नियमाचा फायदा झाला, ज्यामुळे तिला जीवदान मिळालं.
या सामन्यात 117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 85 धावाच करू शकला. त्याचा 31 धावांनी पराभव झाला.
हेही वाचा –
“जोपर्यंत धोनीची इच्छा आहे, तोपर्यंत आयपीएलचे नियम बदलत राहतील”, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
पृथ्वी शॉनं धो-धो धुतलं! कसोटीत टी20 स्टाईल फलंदाजी; फक्त एवढ्या चेंडूत ठोकलं अर्धशतक
शतकाच्या अगदी जवळ येऊनही दूर राहिला भारतीय खेळाडू, एका चुकीमुळे झालं मोठं नुकसान