सध्या दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 विश्वचषक खेळला जात आहे. स्पर्धा सुरू होऊन अवघे चारच दिवस झालेले असताना, आता स्पर्धेतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बांगलादेश महिला संघाच्या एका फलंदाजाला थेट स्पॉट फिक्सिंग करण्याची ऑफर आली. विशेष म्हणजे ही ऑफर संघातीलच वरिष्ठ खेळाडूने दिली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, बांगलादेश महिला संघाची फलंदाज लता मोंडल हिला बांगलादेशची अनुभवी क्रिकेटपटू शोहेली अख्तर हिने ही ऑफर दिली आहे. मोंडल सध्या विश्वचषक संघाचा भाग असून, अख्तर संघाबाहेर आहे. दोन्ही खेळाडू मधील दूरध्वनी संभाषण व्हायरल झाले असून, त्यामधून या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. लताने स्वतः देखील याबाबत सांगितल्यानंतर तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर करण्यात आले.
अख्तर हिच्या म्हणण्यानुसार, आकाश नावाचा तिचा भाऊ हा एका सामन्यात हिट विकेट अथवा यष्टीचीत होण्यासाठी काही रक्कम देण्यासाठी तयार आहे. अनेक जण फिक्सिंग करतात मात्र समोर येत नाहीत. तू जेव्हा तयार असशील तेव्हा फिक्सिंग करू शकते. हिटविकेट झाल्यास 25 लाख तर यष्टीचीत झाल्यास 5 लाख रुपये मिळतील. तू यासाठी तयार नसली तरी देखील सांगू शकते कोणतीही जबरदस्ती नाही.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरू केली आहे. दुसरीकडे आयसीसीने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने आपली कार्यवाही सुरू केल्याचे सांगितले जातेय.
(Womens T20 World Cup Bangladesh Cricketer Receive Offer For Spot Fixing)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत’, विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा
‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात