---Advertisement---

टी20 विश्वचषक: आयर्लंडविरुद्ध ‘करो वा मरो’ सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी, संघात एक बदल

On: सोमवार, फेब्रुवारी 20, 2023 6:08 PM
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. भारतीय संघ सोमवारी (20 फेब्रुवारी) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

विजेतेपदाचा दावेदार म्हणून भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. मागील विश्वचषकात भारताने अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता. या स्पर्धेत देखील भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सने तर वेस्ट इंडिजला सहा विकेट्सने पराभूत करत शानदार सुरुवात केली होती.‌ मात्र, त्यानंतर भारताला इंग्लंडकडून 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उपांत्य फेरी जागा बनण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल.

भारतीय संघाने या सामन्यासाठी राधा यादव हिला बाकावर बसवून अष्टपैलू देविका वैद्य हिला संधी देण्यात आली. दुसरीकडे आयर्लंड संघ या स्पर्धेत अद्याप एकही सामना जिंकला नाही. ते या पूर्वीच स्पर्धेतून बाहेर झाल्याने ते देखील स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.

आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी हंटर, गेबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलनी (कर्णधार), एमियर रिचर्डसन, लुईस लिटल, मेरी वॉल्ड्रॉन (यष्टीरक्षक), लेआ पॉल, आर्लेन केली, कारा मरे, जेन मॅग्वायर

बातमी अपडेट होत आहे…

(Womens T20 World Cup India Won Toss And Elected Bat First)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी
दिल्ली कसोटी गमावताच पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडला भारत! वाचा संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---