---Advertisement---

टी20 विश्वचषक: उपांत्य सामन्यात टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी! हरमन फिट, संघात तीन बदल

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या उपांत्य सामन्यात उतरला. न्यूलँड्स येथे होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी संघात तीन बदल करण्यात आले.

https://twitter.com/BCCIWomen/status/1628735630380531713?t=jMOREFmjRqgemDi5v9w7XQ&s=19

ब गटातून दुसऱ्या स्थानी राहिल्यानंतर भारतीय संघाला या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान मिळाले. सामन्याच्या सकाळीच संघाची प्रमुख अष्टपैलू पूजा वस्त्रकार दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर गेली. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या संघातील सहभागाविषयी शंका होती. मात्र, अखेरीस तिचा संघात समावेश केला गेला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले.

देविका वैद्य हिच्या जागी राधा यादव हिला संधी दिली गेली. तर, जखमी पूजाच्या जागी स्नेह राणाला स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. साखळी फेरी पूर्णतः अपयशी ठरलेल्या राजेश्वरी गायकवाडच्या जागी फलंदाज यास्तिका भाटियाचा संघात समावेश केला गेला.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ अ गटातून अव्वल स्थानी राहिला होता. मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलेले.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), यस्तिका भाटिया, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग.

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन)- एलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍश्ले गार्डनर, एलिस पेरी, तहिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डार्सी ब्राउन.

(बातमी अपडेट होत आहे)

(Womens T20 World Cup Semi Final Australia Won Toss Elected Bat First Harmanpreet Kaur Fit)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘म्हणूनच बायको सोडून गेली’, धवन अन् बॉलिवूड अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
“सिराजला गोलंदाजीतील विराट व्हायचेय”, माजी प्रशिक्षकांनी सांगितला तो किस्सा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---