भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या संघातून बाहेर आहे. असे असले, तरीही तो सातत्याने माध्यमांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धवनचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तो मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. यावेळी त्याने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी दिसत आहे. शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांची इंस्टाग्राम रील सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धवन-हुमाचा मजेशीर व्हिडिओ
या इंस्टाग्राम रील (Instagram Reel) व्हिडिओमध्ये शिखर धवन आणि हुमा कुरेशी (Shikhar Dhawan And Huma Qureshi) फोनवर बोलताना दिसत आहेत. यामध्ये हुमा कुरेशी (Huma Qureshi) पंजाबीमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan) याला म्हणते की, “आपले लग्न होऊ शकत नाही.” यावर धवन विचारतो की, “का? उद्याच तर आपले लग्न झाले आहे.” त्यानंतर हुमा म्हणते की, “ओह… फोन तुम्हाला लागला होय.” यानंतर धवन हसत हसत फोन कट करतो. मात्र, फोन कट केल्यानंतर त्याला समजते की, हुमा काय बोलून बसली. यावेळी तो अशी रिऍक्शन देतो, जशी त्याची फसवणूक झाली आहे.
धवन आणि हुमाच्या या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांना तुफान पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 23 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 3 लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तसेच, एक हजारांहून अधिक कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “भावा काहीतरी गडबड आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “दोघांचं काहीतरी सुरू आहे.” आणखी एकाने असे लिहिले की, “नवीन जोडपे.” याव्यतिरिक्त एक जण कमेंट करत असेही म्हणाला की, “म्हणूनच बायको सोडून गेली.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “पाजी तुम्ही कमाल पद्धतीने आयुष्य जगताय.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी नाही झाली निवड
सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला. यामध्ये मात्र शिखर धवन याच्या नावाचा समावेश नाहीये. खरं तर, धवनने त्याचा शेवटचा सामना मागील वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता, तेव्हापासून त्याचे पुनरागमन झाले नाहीये. (team india cricketer shikhar dhawan shares funny instagram reel with actress huma qureshi)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, अक्षर पटेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला झटका, दोन प्रमुख खेळाडू एकाचवेळी बाहेर
ब्रेकिंग! टीम इंडियातील मराठमोळ्या क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून थेट घरी परतला