न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा थरार (ICC Women ODI World Cup 2022) सुरू आहे. या विश्वचषकातील सातवा सामना बुधवारी (०९ मार्च) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (ENGW vs WIW) यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत ६ बाद २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४८ षटकांमध्येच २१८ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी वेस्ट इंडिजने ७ धावांनी हा सामना जिंकला.
हा त्यांचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय (West Indies Consecutive Second Win) होता, तर इंग्लंडल सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या रोमांचक विजयानंतर वेस्ट इंडिजच्या संघाला गुणतालिकेतही मोठा फायदा (West Indies Profit In Point Table) झाला आहे.
अशी आहे गुणतालिकेची स्थिती
इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकत वेस्ट इंडिजचा संघ गुणातिलेकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत त्यांनी २ सामने खेळले असून त्यातील दोन्हीही सामने जिंकत आपल्या खात्यात ४ गुण जोडले आहेत. तसेच त्यांचा नेट रन रेटही चांगला झाला असून तो +०.१०० इतका झाला आहे.
वेस्ट इंडिजने या विजयासह गुणतालिकेत भारताला मागे (West Indies Takeover India) टाकले आहे. भारताचा संघ एका विजयासह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजइतकेच २ सामने जिंकूनही सर्वाधिक नेट रन रटमुळे (+१.०६१) गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे अद्याप पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंडच्या संघाला विश्वचषकातील त्यांचे विजयाचे खाते उघडता आलेले नाही. तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने प्रत्येकी १ सामना जिंकला आहे.
असा झाला वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड सामना
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी झटपट धावा करत संघाची धावसंख्या २२५ वर नेली. वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक शेमेन कॅम्पेबेल हिने सर्वाधिक ६६ धावा केल्या. ८० चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या मदतीने तिने ही अर्धशतकी खेळी केली. तिच्याबरोबरच चिडन नेशनने नाबाद ४९ आणि हिली मॅथ्यूजने ४५ धावांचे योगदान दिले. या डावात इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. १० षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तिने या विकेट्स काढल्या.
वेस्ट इंडिजच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २१८ धावात करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी बाउमॉटने सर्वाधिक ४६ धावा चोपल्या. तर सोफी डंक्ले (३८ धावा), सोफी इक्लेस्टोन (३३ धावा) आणि डॅनियल वॉट (३३ धावा) यांनाच ३० धावांचा आकडा ओलांडता आला. इंग्लंडच्या इतर फलंदाज साध्या ३० धावाही करू शकल्या नाहीत.
वेस्ट इंडिजकडून शमिला कॉनेल हिने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. तिने १० षटकात ३८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच हिली मॅथ्यूज आणि हनिसा मोहम्मद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत इंग्लंडला सर्वबाद करण्यात हातभार लावला.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, बीसीसीआयने शेअर केले सरावाचे फोटो
महिला विश्वचषकात ‘मिताली सेना’ भिडणार यजमान न्यूझीलंडशी; अव्वल स्थानाचे असेल लक्ष
मंकडिंगच्या नियमाला अधिकृत मान्यता, माजी क्रिकेटरने अश्विनची पायखेची करत केली ‘खास’ विनंती