सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा (Womens world cup 2022) न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) भारतीय संघाचा तिसरा सामना वेस्ट इंडीज संघासोबत पार पडला. या सामन्यात भारताच्या सलामी जोडीने शानदार कामगिरी केली आहे. मागील सामन्यात यस्तिका भाटियाच्या (Yastika Bhatia) खेळीवर टीका केली गेली, परंतु शनिवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यातील तिची फलंदाजी पाहून सर्वजण चकित झाले आहेत. दुसऱ्या षटकात भाटियाने तीन चौकार लगावले.
https://www.instagram.com/p/Ca_CRYbqEJo/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या ५ षटकांमध्ये ५० धावा केल्या होत्या. यास्तिका भाटियाला मागील सामन्यात शेफाली वर्माच्या जागी संधी मिळाली होती. यास्तिकाने न्यूझीलंडविरुद्ध संथ गतीने फलंदाजी केली. मागच्या सामन्यात तिने ५९ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळी दरम्यान तिने २ चौकार लगावले.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात यास्तिकाने चांगली कामगिरी केली. तिने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. या दरम्यान तिने ६ चौकार लगावले. तिने या सामन्यात चिनले हेनरीच्या दुसऱ्या षटकात सलग तीन चौकार लगावले आहेत. या सामन्यात कर्णधार मिताली राजने शेफाली ऐवजी यास्तिकाला खेळण्याची संधी दिली. या सामन्यानंतर आता शेफालीचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.
भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध खेळला. दुसरा सामना भारताने न्यूझीलंड संघाविरुद्ध आणि तिसरा सामना शनिवारी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला आहे. यामधील एक सामना भारताने जिंकला आहे, तर एका सामन्यात भारतीय संघाला अपयश आले आहे.
वेस्ट इंडीज महिला प्लेइंग इलेवनः
डिएंड्रा डॉटिन, हेले मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमेन कॅंपबेल (यष्टीरक्षक), चेडियन नेशन, चिनेल हेनरी, आलिया एलेने, शमिलिया कॉनेल, अनीसा मोहम्मद, शकीरा सेलमैन.
भारत महिला प्लेइंग इलेवन:
यास्तिका भाटिया, स्म्रीती मंधाना, दीप्ती शर्मा, मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक) स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड.