---Advertisement---

तब्बल १० वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडली ही घटना; बेंगलोर कसोटीत मयंक धावबाद होताच…

On: शनिवार, मार्च 12, 2022 4:10 PM
mayank runout
---Advertisement---

बेंगलोर येथील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन्ही संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना होत आहे. (India And Sri Lanka Second Test Match) या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) अत्यंत दुर्दैवीरित्या धावबाद झाला. (Mayank Agarwal Runout) त्याच बरोबर मयंक धावबाद होताच तब्बल दहा वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर धावबाद झाला.

तब्बल १० वर्षांनंतर घडली अशी घटना

मयंक या सामन्यात धावबाद होताच कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल २०१२ नंतर कोणताही भारतीय सलामीवीर धावबाद झाला आहे. यापूर्वी माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग २०१२ मध्ये इंग्लंड विरुद्ध कोलकाता कसोटीत धावबाद झालेला. तसेच या मैदानावर अखेरच्या वेळी कोणत्याही प्रकारात धावबाद होणारा भारतीय फलंदाज विराट कोहली हा होता. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१२ मध्ये वनडे सामन्यात सर्वप्रथम २०९ धावा केलेल्या सामन्यात विराट खातेही न खोलता धावबाद झालेला.

मयंक झाला धावबाद

मालिका क्लिन स्विप करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरला. पहिल्या षटकात चौकार मारून चांगला प्रारंभ केलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या षटकात पहिला धक्का श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो हा गोलंदाजी करत असताना, चौथ्या चेंडूवर मयंक अगरवाल चकला. चेंडू पॅडवर लागल्याने श्रीलंकेच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र, पंच अनिल चौधरी यांनी अपील फेटाळले. यादरम्यान चेंडू कव्हर्सच्या दिशेने गेला. तेव्हा मयंक धाव घेण्यासाठी धावला. क्षेत्ररक्षक जयविक्रमा याने चेंडू उचलून यष्टीरक्षक डिकवेलाकडे फेकला व मयंकला धावबाद करण्याचा प्रयत्न केला.

https://twitter.com/AYUSHPA46545443/status/1502567385248661506?t=G8j6386s1kV5qgybdEBS9g&s=19

 

पंचांनी काहीही निर्णय न दिल्याने श्रीलंकेच्या खेळाडूंनाही सर्वप्रथम पायचीतसाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यामध्ये गोलंदाज फर्नांडो याने टाकलेला चेंडू नो बॉल असल्याचे निदर्शनास आले. नो बॉलवर फलंदाज धावबाद होत असल्याचा नियम असल्याने मयंकला धावबाद पद्धतीने बाद देण्यात आले. आपल्या घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मयंकसाठी हा अनपेक्षित धक्का होता.

महत्वाच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌बातम्या-

Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय

सहावी ओव्हर, सहावा चेंडू, रोहितचा षटकार अन् दर्शकाचं नाक; थेट रुग्णालयात करावं लागलं दाखल 

Ind v SL : निर्णायक कसोटीत रोहितने टॉस जिंकला, प्रथम बॅटींगचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---