भारतीय महिला क्रिकेट संघ गेल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत झाल्यामुळे न्युझीलँड विरुद्ध होणारा सामना भारतीय संघासाठी करो या मरो असाच आहे.
सध्या भारतीय संघाचे ६ सामन्यात ८ गुण असून नेट रनरेट आहे +0.150. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका संघ असून आफ्रिकेचे ६ सामन्यात ९ गुण आहेत तर रनरेट आहे +1.722. हा रनरेट भारत आणि पाचव्या स्थानावरील न्युझीलँड संघापेक्षा सरस आहे. न्युझीलँड संघ पाचव्या स्थानावर असून त्यांचे ६ सामन्यात ७ गुण असून +1.386 असा रनरेट आहे.
१५ जुलै रोजी साखळी फेरीतील शेवटचे सामने होत असून यात भारताचा सामना हा न्युझीलँड विरुद्ध होणार आहे तर दक्षिण आफ्रिका संघाचा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.
समीकरणे:
# जर भारत न्युझीलँड विरुद्धचा सामना जिंकला आणि आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकली तर भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील.
# जर भारत न्युझीलँड विरुद्धचा सामना जिंकला आणि आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरली तरीही भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील.
# जर भारत न्युझीलँड विरुद्धचा सामना पाऊसामुळे रद्द झाला तर भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील.
# जर भारत न्युझीलँड विरुद्धचा सामना पाऊसामुळे रद्द झाला आणि आफ्रिकाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामनासुद्धा पाऊसामुळे रद्द झाला तर भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील.
# जर भारत न्युझीलँड विरुद्धचा सामना हरला आणि आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकली तर न्युझीलँड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील.
# जर भारत न्युझीलँड विरुद्धचा सामना हरला आणि आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरली तर न्युझीलँड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील.
वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आधीच स्पर्धेबाहेर पडले आहेत.