भारतीय महिला संघाने तब्बल १८६ धावांनी न्युझीलँड संघाला पराभूत करून महिला विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठली आहे. मिताली राजच शतक आणि राजेश्वरी गायकवाडच्या ५ विकेट्सच्या जोरावर भारताने उपांत्यपूर्व फेरीचा सामना संबोधल्या गेलेल्या या सामन्यात विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून न्युझीलँडने भारताला पहिले फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधार मिताली राजच्या खणखणीत शतकाच्या जोरावर आणि हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्तीच्यायांच्या शतकी भागीदाऱ्याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २६६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
मितालीने शतकी खेळीत १२३ चेंडूंत १०९ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौ(६०) तर वेदा कृष्णमूर्ती(७०) यांनी योग्य साथ दिल्यामुळे निर्धारित ५० षटकात भारताने न्युझीलँड समोर ५० षटकात २६६ धावांचे लक्ष ठेवले होते.
निर्धारित २६६ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या न्युझीलँड संघ भारतीय गोलंदाजीसमोर २५.३ षटकांत ७९ धावांवर कोलमडला. त्यात राजेश्वरी गायकवाड(५), दीप्ती शर्मा(२), पूनम यादव(१), शिखा पांडे(१) आणि झुलन गोस्वामी(१) यांनी विकेट्स घेतल्या.
मिताली राजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारताचा उपांत्यफेरीचा सामना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाबरोबर २० जुलै रोजी होणार आहे.