इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. जिथे कर्णधाराच्या चुकीनंतरही संघाला तोटा झाला नाही आणि एक विकेट मिळाली. इतकेच नव्हेतर अवघ्या एका चेंडूनंतर कर्णधाराने आपली चूक सुधारत जबरदस्त झेल घेत संघाला यश मिळवून दिले.
इंग्लंडमध्ये एकीकडे लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना खेळवला जात असताना, दुसरीकडे काउंटी चॅम्पियनशिपचे सामने इतर शहरांमध्ये खेळवले जात आहेत. असाच सामना वूस्टरशायर आणि एसेक्स यांच्यात चेम्सफोर्ड येथेही खेळला जात आहे. या सामन्यात वूस्टरशायरने एसेक्ससमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या छोट्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी वूस्टरशायरला लवकर विकेट्स घेण्याची गरज होती आणि त्यांनी 2 विकेट लवकर घेतल्या.
असे असूनही, संघाला आणखी विकेटची गरज होती आणि अशीच एक संधी 21 व्या षटकात आली. जेव्हा लोगन व्हॅन बीक गोलंदाजी करत होता. त्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉर्डन कॉक्सने मिड-ऑनच्या दिशेने एक फटका खेळला. वूस्टरशायरचा कर्णधार ब्रेट डी’ऑलिव्हिएरा खेळपट्टीच्या शेजारी सिली मिड-ऑनवर क्षेत्ररक्षण करत होता. झेल घेण्यासाठी त्याने डावीकडे झेप घेतली. मात्र, एका हाताने झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्याच्या हातातून चेंडू निसटला. कर्णधार, गोलंदाज आणि इतर क्षेत्ररक्षक निराशा व्यक्त करण्याआधीच त्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली.
Describe this for me 👇 https://t.co/gtO4V2SoNx pic.twitter.com/QbecUJdtao
— Worcestershire CCC (@WorcsCCC) September 1, 2024
कर्णधाराकडून झेल सुटला असला तरी, चेंडू नॉन-स्ट्राईकच्या स्टंपला लागला. जिथे दुसरा फलंदाज रॉबिन दास क्रीजच्या बाहेर असल्याने तो धावबाद झाला. अशाप्रकारे चूक होऊनही वूस्टरशायरच्या कर्णधाराने संघाला आनंद मिळवून दिला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉर्डन कॉक्सने पुन्हा तोच फटका खेळला. यावेळी मात्र ब्रेट याने शानदार झेल पकडत संघाला चौथे यश मिळवून दिले.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!