---Advertisement---

ब्रॉडने षटकार मारत दाखवला धाक, दुसऱ्याच चेंडूवर बोल्ड करत गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर

On: सोमवार, जून 7, 2021 8:27 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामना रविवारी (०६ जून) पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाचा दुसरा आणि सामन्याचा अखेरचा डाव सुरू असताना प्रतिस्पर्धी न्यूझीलंडने त्यांना चितपट करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अखेर इंग्लंडला हा सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. दरम्यान उभय संघातील खेळाडूंमध्ये छोटी चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात इंग्लंड संघाच्या पहिल्या डावात उपकर्णधार स्टुअर्ट ब्रॉड याने २४ चेंडूत १० धावांची खेळी केली होती. या खेळीमध्ये त्याने एक षटकार देखील मारला होता. हा षटकार त्याने नील वॅगनरच्या चेंडूवर पुल शॉट मारत लगावला होता. परंतु पुढच्याच चेंडूवर वॅगनरने आपल्या अचूक यॉर्करने ब्रॉडची दांडी गुल केली होती.

तर झाले असे की, वॅगनरने टाकलेल्या चेंडूवर जेव्हा ब्रॉडने षटकार मारला; तेव्हा वॅगनरच्या चेहऱ्याचे हावभाव सांगत होते की, तो निराश झाला आहे. परंतु पुढच्याच चेंडूवर त्याने वेगवान यॉर्करचा मारा करत ब्रॉडला माघारी धाडले होते. ब्रॉड बाद झाल्याचा वॅग्नरला भलताच आनंद झाला होता. त्याने या विकेटचा जल्लोष साजरा केलाच. यासोबतच तो आक्रमक झाल्याचे देखील दिसून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mscmedia2/status/1401210403661651984?s=20

या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला अवघ्या २७५ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाकडून रॉरी बर्न्स याने १३२ धावांची खेळी केली होती. बर्न्स व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंड संघाने दुसरा डाव १६९ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज पाचव्या दिवसाखेर १७० धावा करत सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरले.

महत्त्वाच्या बातम्या-

शानदार कारकिर्द अन् क्रिकेटची उत्तम जाण असूनही गावसकर प्रशिक्षकपदापासून दूर? वाचा कारण

मोठी बातमी! रॉबिन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित; लॉर्ड्सवर पदार्पण करताना न्यूझीलंडविरुद्ध घेतल्यात ७ विकेट्स

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी युवीने वाचला भारतीय संघासमोरील अडचणींचा पाढा; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---