---Advertisement---

विराट कोहलीचा पुढील ३ वर्षांतील ३ विश्वचषकांचा प्लॅन; विराटकडूनच घ्या जाणून…

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 5:46 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) स्वत:ला पुढील ‘तीन कठीण वर्षांसाठी’ तयार करत आहे. या दरम्यान तो तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणार आहे. यानंतरच तो आपल्या कामाचे मूल्यांकन करेल.

विराट पुढील 3 वर्षात 2 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 1 वनडे विश्वचषक खेळणार आहे. त्यानंतर तो तीनपैकी दोन क्रिकेट प्रकारात खेळण्याचा विचार करू शकतो.

“माझे लक्ष दूरच्या पल्ल्यावर आहे. मी स्वत: ला पुढील 3 वर्षांसाठी तयार करत आहे. यानंतर कदाचित आपली चर्चा होऊ शकते,” असे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला.

यावेळी विराटने मान्य केले की, थकवा आणि कामकाजाचे व्यवस्थापन हे अशाप्रकारचे मुद्दे आहेत ज्यांची सर्व व्यासपीठावर चर्चा करण्याची गरज आहे.

“या विषयापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. जवळपास 8 वर्षांपासून मी एका वर्षात 300 दिवस खेळत आहे. यामध्ये प्रवास आणि सराव सत्रांचा समावेश आहे. असे असतानाही मी प्रत्येक वेळी त्याच उत्साहात मैदानावर उतरतो,” असे कामकाजाबद्दल बोलताना विराट म्हणाला.

विराट यावर्षी 31 वर्षांचा होईल. यावेळी विराटने मान्य केले की, वेळो-वेळी विश्रांती घेणे फायद्याचे ठरले आहे.

याविषयी बोलताना विराट म्हणाला की, “असे नाही की खेळाडू प्रत्येक वेळी याबद्दलच विचार करत असतात. आम्ही वैयक्तिकरित्या मध्ये-मध्ये विश्रांती घेत असतो. तरीही कित्येक वेळा वेळापत्रक तुम्हाला असे काही करण्याची परवानगी देत नाही. हे त्या खेळाडूंसाठी महत्त्वाचे असते जे खेळाडू तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत असतात,” असेही तो पुढे म्हणाला.

विराटसाठी हे केवळ त्याच्या कामगिरीबद्दल नाही तर त्याच्या नेतृत्वासाठीदेखील महत्त्वाचे आहे. रणनीती बनविण्यासाठी नेहमी लक्ष केंद्रित करावे लागते. “कर्णधार होणे तसेच सराव सत्रातही तीच तीव्रता दाखविणे इतके सोपे नाही. यामुळे तुमच्यावर खूप ताण पडतो. अशावेळी विश्रांती घेत राहणे फायद्याचे ठरते,” असेही यावेळी विराट म्हणाला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 21 फेब्रुवारीपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (2 Matches of Test Series) सुरुवात होणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला 21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे सुरुवात होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---