पुणे । भारत अ मुले आणि मुलींच्या संघाने महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील सिलेक्टेड टीममध्ये अनुक्रमे चीन आणि यूएई संघावर मात केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सिलेक्टेड टीम मुलांच्या ग्रुप १ मध्ये भारत अ संघाने चीनवर ४-१ने मात केली. यात दुहेरीत रितूपर्णा बोरा – पारस माथूर जोडीने ज्हि डिंग – जिआजून लियू जोडीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला. तर तरुण – वरुण त्रिखा जोडीने युफेंग काओ – हाओयिन वांग जोडीवर २१-१९, २१-१८ अशी मात करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर एकेरीत तरुणने डिंगवर २१-१२, २१-१५ अशी मात करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर चीनच्या युफेंग काओने वरुणवर १५-२१, २१-१८, २१-१९ अशी मात केली. मात्र, एकेरीतील अखेरच्या लढतीत राजकंवरने वांगवर २१-१६, २१-११ अशी मात करून भारत अ संघाला ४-१ने विजय मिळवून दिला.
यानंतर सिलेक्टेड टीममध्ये मुलींच्या ग्रुप -२ मध्ये भारत अ संघाने यूएईवर ५-०ने मात केली. दुहेरीत निकिता – कलिता जोडीने रौधा सईद अल्हाजेरी – सारा अली अल्मेहैरी जोडीवर २१-६, २१-२ असा, तर शिवप्रिया – अंजना कुमारी जोडीने मर्यम मलाल्ला अब्दुलाझिझ – मैथा रशीद अल्माझ्रोए जोडीवर २१-४, २१-३ असा विजय मिळवला. यानंतर एकेरीत कलिताने सारावर २१-७, २१-२ असा सहज विजय मिळवून भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. भारताच्या प्रेरणा अल्वेकरने रौधावर २१-१, २१-४ असा, तर निकिताने मैथावर २१-१, २१-४ असा सहज विजय मिळवला.
इतर लढतीत सिलेक्टेड टीम्समध्ये मुलींच्या ग्रुप १ मध्ये फ्रान्सने भारत ब संघावर ४-१ने, तर चीनने इंग्लंडवर ५-०ने मात केली. शालेय मुलींच्या गटात बेल्जियमने जॉर्जियावर ४-१ने, तर फ्रान्सने तुर्कीवर ३-२ने मात केली. ग्रुप ३ मध्ये चायनीज तैपेईने इटलीवर ५-०ने मात केली, तर बल्गेरियाने भारत ब संघावर ५-०ने विजय मिळवला. शालेय मुलांच्या गटात तुर्किने बल्गेरियावर ५-०ने, इंग्लंडने जॉर्जियावर ५-०ने, तर चायनीज तैपेईने इटलीवर ५-०ने मात केली.
पुण्याच्या तनिष्का देशपांडेची शानदार कामगिरी
मुलींच्या ग्रुप-१मध्ये भारत ब संघाने इंग्लंडचे आव्हान ४-१ने परतवून लावले. यात दुहेरीत वेन्नेला श्री कोकांती- अनिशा वसे जोडीने लीह अलेन – मेगन थॉमस जोडीवर २१-१५, २१-११ असा विजय मिळवला. यानंतर तनिष्का देशपांडे-वर्षा वेंकटेश जोडीने नताशा लाडो-अँजेलिना वाँग जोडीवर २१-९, १४-२१, २१-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. एकेरीत तनिष्काने अँजेलिनावर २१-५, २१-११ अशी मात करून भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. वर्षाने लीहचे आव्हान २१-५, २१-११ असे परतवून लावले. एकेरीतील अखेरच्या लढतीत इंग्लंडच्या नताशाने भारताच्या अनिशावर १८-२१, २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला.
निकाल – सिलेक्टेड टीम्स – मुले ग्रुप-१ – भारत अ – ४ वि. वि. चीन – १ (रितूपर्णा बोरा-पारस माथूर वि. वि. ज्हि डिंग-जियाजून लियू २१-१५, २१-१२, तरुण मन्नेपल्ली-वरुण त्रिशा वि. वि. युफेंग काओ-हाओयिन वांग २१-१९, २१-१८, तरुण वि. वि. डिंग २१-१२, २१-१५, वरुण पराभूत वि. युफेंग २१-१५, १८-२१, १९-२१, राजकंवर मोनिमुग्धा वि. वि. वांग २१-१६, २१-११).
चायनीज तैपेई – ५ वि. वि. भारत ब – ० (स्सू वेई होयू-पो वेई सू वि. वि. अर्जुन रेहानी-अनिरुद्ध विक्रमसिंह २१-८, २१-९, चिंग शेंग चांग – चेन यू सुन वि. वि. आर्यमन गोयल-अनिश चंद्रा जोजुला २१-९, २१-११, चेंग एन वू वि. वि. अर्जुन २१-१८, २१-१३, चेन यू सून वि. वि. अनिश २१-१७, २१-१९, चिंग शेंग चांग वि. वि. गौतम १८-२१, २१-१७, २१-१५).
मुली ग्रुप-२ – भारत अ – ५ वि. वि. यूएई – ० (निकिता-चिमरन कलिता वि. वि. रौधा सईद अल्हाजेरी – सारा अली अल्मेहैरी २१-६, २१-२, शिवप्रिया कलैयारसी एम. – अंजना कुमारी वि. वि. मर्यम मलाल्ला अब्दुलाझिझ -मैथा रशीद अल्माझ्रोए २१-४, २१-३, कलिता वि. वि. सारा अली अल्मेहैरी २१-७, २१-२, प्रेरणा अल्वेकर वि. वि. रौधा २१-१, २१-४, निकिता वि. वि. मैथा २१-१, २१-४).
मुली ग्रुप – १ – फ्रान्स – ४ वि. वि. भारत ब – १ (डेसमन्स – ज्युलिएट मोइनार्ड वि. वि. तनिष्का देशपांडे – वर्षा वेंकटेश २१-१३, २१-११, मेरिग – चार्लोट गॅन्सी वि. वि. व्हेन्नेला श्री कोकांती – अनिशा वसे २१-१४, २१-१०, शरोने पराभूत वि. तनिष्का देशपांडे १०-२१, २३-२१, १८-२१, ज्युलिएट वि. वि. अनिशा २१-१७, २३-२१, डेसमन्स वि. वि. वर्षा वेंकटेश २१-१०, २१-१८).
शालेय मुले – ग्रुप १ – ग्रीस – ५ वि. वि. भारत ब – ० (ख्रिस्तोस – निकोलाओस वि. वि. मिहिर – नमराज २१-६, २१-२, लोअनिस लामाझाकिस – अँटोनिओस स्टेफनिडिस वि. वि. अभिमन्यू – अर्णव २१-१०, २१-९, निकोलाओस वि. वि. मिहिर २१-४, २१-४, ख्रिस्तोस वि. वि. अर्णव २१-३, २१-२, स्टेफानोस वि. वि. अभिमन्यू २१-११, २१-६).
मुली ग्रुप ३ – बल्गेरिया -५ वि. वि. भारत ब -० (व्हॅलेंटिना-मिहाएला वि. वि. खुशी – मैथली २१-७, २१-१, असाया पौनोवा – व्हिक्टोरिया वि. वि. रुची – श्रुती २१-९, २१-७, व्हॅलेंटिना वि. वि. मैथली २१-४, २१-९, मिहाएला वि. वि. खुशी २१-८, २१-८, व्हिक्टोरिया वि. वि. रुची २१-११, २१-१०).