---Advertisement---

फिफा विश्वचषक: कमी वयात अंतिम सामन्यात गोल करणारा हा ठरला दुसराच खेळाडू

On: सोमवार, जुलै 16, 2018 4:52 PM
---Advertisement---

मॉस्को।  फिफा विश्वचषकाच्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गोल करणारा कायलिन एमबाप्पे हा दुसराच कमी वयातील खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी ब्राझिलचा महान खेळाडू पेले यांनी केली होती.

फ्रान्सच्या 19 वर्षीय एमबाप्पेने या स्पर्धेत 7 सामन्यात 4 गोल केले आहेत. तसेच अंतिम फेरीत त्याने 65व्या मिनीटाला गोल करून ही अनोखी कामगिरी केली. यामुळे त्याला ‘फिफा यंग प्लेयरचा अवॉर्ड’ही मिळाला आहे.

त्याच्या या कामगिरीचे कौतुक ब्राझिलचे महान खेळाडू पेले यांनी ट्विटरवर अभिनंदन करून केले आहे.

पेले यांनी 17 वर्षांचे असताना 1958च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात स्वीडनच्या विरुद्ध 2 गोल केले होते.

15 जुलैला झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने पराभूत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

पेले हे पुढे म्हणाले, “जर एमबाप्पे असाच खेळत राहिला तर मला परत मैदानात उतरावे लागेल.”

एमबाप्पेने त्याच्या या विक्रमाविषयी बोलताना म्हणाला,”पेले यांनी फुटबॉमध्ये इतिहास केला आहे. मी फक्त माझा नैसर्गिक खेळ करत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार

फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसने पटकावले दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment