भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3डिसेंबर) फ्रान्स विरुद्ध स्पेन सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्सने आज स्पेनला चांगलीच टक्कर दिली.
या सामन्यात फ्रान्सकडून क्लेमेंट टिमोथी तर स्पेनकडून इग्लेसियास अल्वारो यांनी प्रत्येकी एक गोल केला.
विश्वचषकात 28 वर्षानंतर खेळणाऱ्या फ्रान्सने सामन्याला उत्तम सुरूवात केली. त्यांच्याकडून 18 वर्षीय टिमोथीने 6व्याच मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
यावेळी स्पेनला एकूण 7 पेनल्टी कॉर्नर मिळाल्या होत्या. मात्र फ्रान्सचा गोलकिपर थिफ्री आर्थरने स्पेनचे अनेक हल्ले रोखले.
2013 पासून या दोन संघामध्ये एकूण 10 सामने झाले असून स्पेन 6 सामने जिंकत पुढे होता. मात्र आजच्या सामन्यात फ्रान्सने त्यांचा उत्तम प्रतिकार केला.
पहिल्या सत्रात फ्रान्सचा एक गोल झाल्याने स्पेनने आक्रमकपणे खेळाला सुरूवात केली. नंतरच्या दोन सत्रात मात्र दोन्ही संघाने अटीतटीचा खेळ केल्याने कोणालाही गोल करता आला नाही.
अर्जेंटिना विरुद्ध पहिल्या सामन्यात तीन गोल करणाऱ्या स्पेनला आजच्या सामन्यात पहिला गोल करण्यास पूर्ण 48 मिनिटे लागली. अल्वारो स्पेनकडून हा विजयी गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
तसेच स्पेनला या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.
स्पेनला जरी या सामन्यात गोल करण्यात अपयश येत होते तरी त्यांचा गोलकिपर कोरतेज किंक्कोने विरोधी संघाचे अनेक हल्ले रोखले.
चौथ्या सत्रात फ्रान्सला विजयाची संधी होती. मात्र किंक्कोने फ्रान्सचा पेनल्टी स्ट्रोक अडवत त्यांना या विश्वचषकातील पहिल्या विजयापासून रोखले. तसेच तो या सामन्याचा नायक ठरला.
तसेच या स्पर्धेत टीकून राहायचे असेल तर दोन्ही संघांना त्यांच्या पुढील सामन्यात विजय आवश्यक आहे. या दोन्ही संघांचे 6 डिसेंबरला सामने असून पहिला सामना स्पेन विरुद्ध न्यूझीलंड आणि दुसरा सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजबद्दल या खास गोष्टी माहिती आहेत का?
–एकाच जागी, एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा १९ वर्षीय युवराज सिंग, पहा व्हिडीओ…