कतारने 2022च्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यासाठी फिफाच्या नियमांचे उल्लंघन केले. 2010ला झालेल्या या लिलावात कतारने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांबद्दल माहिती काढण्यासाठी गुप्तहेर नेमले होते.
या लिलावात कतार बरोबरच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे देशही शर्यतीत होते. पण कतारला हे यजमान पद मिळावे यासाठी त्यांनी जे गुप्तहेर नेमले होते ते या दोन देशांबद्दल अफवा पसरवत होते.
न्युयॉर्कमधील ब्राऊन लोइड जेम्स या कंपनी बरोबरच सीआयएचा (सेंट्रल इंटिलीजन्स एजन्सी) माजी एजंट यांची या मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
हे आरोप मात्र कतारच्या सुप्रीम कमिटीने फेटाळले आहेत. “आम्ही अश्या कोणत्याच अधिकाऱ्यांची नेमणुक केली नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
“आम्ही फिफाच्या नियमांचे योग्य रितीने पालन केले आहे. अमेरिकन वकील मायकल ग्रॅसिया यांच्या नेतृत्वाखाली असलेली तपासणीही आम्ही पुर्ण केली.”
फिफाचे नियम असे आहेत, जे या लिलावात सामील झाले त्यांना यामधील लेखी अथवा तोंडी विधाने करण्यास मनाई आहे.
कतारच्या अधिकाऱ्यांनी एकाला लिलावासंबंधीचे रिपोर्ट करण्यासाठी 9000डॉलर दिले. तसेच असे काही पत्रकार आणि ब्लॉगर्स नेमले जे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया विरोधात वक्तव्य करतील. ऑस्ट्रेलियातील एका रग्बीच्या सामन्यात त्यांनी काही विरोधकेही पाठवली होती.
यासंदर्भात फुटबॉल असोसिएशन आणि इंग्लंड लिलावाचे माजी अध्यक्ष लॉर्ड ट्रेसमन यांनी फिफाला अधिक तपास करण्यास सांगितला आहे.
याआधी कतारवर भ्रष्टाचार केल्याचाही आरोप होता. मात्र तो नंतर फिफाच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षे केलेल्या तपासणीत दूर केला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–मेसट ओझीलला पाठींबा देण्यासाठी ट्विटरवर चाहत्यांनी सुरू केली चळवळ
–नाणेफेक झाली चक्क क्रेडिट कार्डने!