रोहित शर्मा याचे शतक आणि विराट कोहली याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने बुधवारी (11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध अप्रतिम विजय साकारला. वनडे विश्वचषक 2023 मधील भारताचा हा सलग दुसरा विजय, तर अफगाणिस्तानचा सलग दुसरा पराभव ठरला. या विजयासाठी गोलंदाजी विभागतून जसप्रीत बुमराह याचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. भारतीय संघाने हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला.
अफगाणिस्तानने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजीला आलेल्या भारताने अफगाणिस्तानला 8 बाद 272 धावांवर रोखले आणि यजमान संघाला विजयासाठी 273 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या 35 षटकांमध्ये 2 विकेट्सच्या नुकसानावर 273 धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना नावावर केला. रोहित शर्मा (Rohit Sharma) सामनावीर ठरला, ज्याने अवघ्या 84 चेंडूत 131 धावा कुटल्या. यात 16 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानसाठी हसमतुल्लाह शहिदी (Hashmatullah Shahidi) याने 80, तर अजमतुल्लाह ओमरजाई याने 62 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त एखही अफगाणी फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यांच्या चार खेळाडूंना एकट्या जसप्रीत बुमराह याने तंबूत धाडले. हार्दिक पंड्या याने 7 षटकांमध्ये 2 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स घेता आल्या.
भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर रोहितच्या साथीने ईशान किशन सलामीवीर म्हणून खेळला. कर्णधार फॉर्ममध्ये असला, तर ईशान किशनला अर्धशतक करता आले नाही. त्याने 47 धावांवर विकेट गमावली. विराट कोहली याने 56 चेंडूत 55* धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर यानेही 25* धावांचे योगदान दिले. भारताने गमावलेल्या दोन्ही विकेट्स राशिद खान याने घेतल्या, राशिदने 57 धावा खर्च करून 2 रोहित आणि ईशानची शिकार केली. (World Cup 2023 । INDIA BEAT AFGHANISTAN BY 8 WICKET)
स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने हालवलं ख्रिस गेलचं ‘सिंहासन’, खास यादीत अखेर पहिला क्रमांक मिळवलाच
वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सर्वात बेस्ट! शतक ठोकत निघाला सचिन-विराटच्या खूप पुढे