---Advertisement---

रचिनने रचला इतिहास! वर्ल्डकप पदार्पणातच झळकावले दणदणीत शतक, न्यूझीलंड विजयाच्या दिशेने

Rachin Ravindra
---Advertisement---

वनडे विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडसाठी डेवॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र यांनी शानदार फलंदाजी केली. 283 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडकडून या दोघांनी शतक ठोकले. कॉवनेच्या शतकानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच रचिन रविंद्र यायचे शतक पाहायला मिळाले. एकंदरीत पाहता न्यूझीलंडसाठी विश्वचषकाची सुरुवात या दोघांनी धमाकेदार केली.

उभय संघांतील या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावा केल्या. प्रत्युत्तरात डेवॉन कॉनवे याने न्यूझीलंडसाठी पहिले शतक ठोकले. त्यापाठोपाठ रचिन रविंद्र (Rachin Ravindra) यानेही अवघ्या 82 चेंडूत शतक पूर्ण केले. योघांमध्ये यादरम्यान द्विशतकी भागीदारी पार पडली.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन- डेवॉन कॉनवे, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम( कर्णधार), ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, मॅट हेन्री.
(World Cup 2023 ENG vs NZ HUNDRED FOR RACHIN RAVINDRA)

महत्वाच्या बातम्या – 
याला म्हणतात फॅन्स! टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयासाठी रोहित समर्थकांकडून पुण्यात अन्नदान
इंग्लंडच्या 11फलंदाजांंनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास! केला 48 वर्षात कोणालाही न जमलेला कारनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---