INDvsAUS Final Pitch Controversy: विश्वचषक 2023 स्पर्धेत खेळपट्टीचा वाद थांबायचा नाव घेत नाहीये. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टीच्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या उपांत्य सामन्यादरम्यान सुरू झालेला खेळपट्टीचा वाद अजूनही सुरूच आहे. अंतिम सामन्यापूर्वी आता प्रश्न उपस्थित होत आहेत की, आयसीसी वानखेडे स्टेडिअमप्रमाणे नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येही खेळपट्टी बदलणार आहे का? यावर आयसीसीने आधीच स्पष्टीकरण दिले आहे की, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांचे मोठे विधान समोर आले आहे. त्यांनी या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
गावसकरांनीही मांडलेलं मत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथील जगप्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीही खेळपट्टी बदलण्याची चर्चा सुरूच आहे. मागील काही दिवसांपूर्वी भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांनी याविषयी विधान करत म्हटले होते की, हे काम पीच क्यूरेटरचे असते. गावसकरांनी टीका करणाऱ्यांवर टीकास्त्र डागत म्हटले होते की, खेळपट्टी भारत आणि न्यूझीलंडसाठी एकसारखीच आहे. याचा वापर करणे खेळाडूंवर अवलंबून आहे.
काय म्हणाले चॅपेल?
आता ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल (Ian Chappell) यांनीही याविषयी म्हटले की, पीच क्यूरेटरला एकटे सोडले पाहिजे. कारण, अंतिम सामन्यासाठी चांगली खेळपट्टी देणे, हे त्यांचे काम आहे. खेळाडूंना जे काम दिले गेले आहे, त्यावर त्यांनी चांगले खेळले पाहिजे.
Captain Pat Cummins inspects the pitch ahead of the final 🔍#CWC23 #INDvAUS pic.twitter.com/ymBAK5o8x6
— ICC (@ICC) November 18, 2023
‘खेळपट्टी बनवणे क्यूरेटरचे काम’
इयान चॅपेल म्हणाले की, “मी तसाच विचार करतो, जसा मी नेहमी विचार केला आहे. क्यूरेटरने खेळपट्टी बनवली पाहिजे आणि खेळाडूंनी त्यावर खेळले पाहिजे. हे क्यूरेटरशिवाय इत कोणावरही अवलंबून नसले पाहिजे. मी नेहमीच प्रत्येक खेळपट्टीविषयी हेच म्हणालो आहे. विश्वचषक किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नका. क्यूरेटर खेळपट्टी बनवतो आणि बाकी सर्व यापासून दूर असतात.”
यावरून स्पष्ट होते की, माजी कर्णधारानेही या प्रकारच्या अफवांवर लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे. इयान चॅपेल यांनी त्यांच्या कारकीर्दीत 1971 ते 1975 यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले होते. (world cup 2023 final ind vs aus pitch controversy ian chappell statement stay away from this)
हेही वाचा-
CWC 2023: ‘फक्त या माणसासाठी विश्वचषक जिंकायचाय’, कर्णधार रोहितने थेट नावच सांगून टाकलं
अरररर! थेट मुख्यमंत्र्यांच्या पोरालाच नाही मिळालं फायनलचं तिकीट, म्हणाले….