INDvsAUS Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक 2023 अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. 20 वर्षांनंतर अंतिम सामन्यात भिडण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांच्या कमजोरी लक्षात घेऊन जोरदार तयारी करत आहेत. अशात अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींना एक प्रश्न सतावतोय की, खराब वातावरणामुळे सामना झाला नाही, सामना बरोबरीत सुटला किंवा इतर कोणती समस्या उद्भवली, तर विश्वचषक विजेता कोण असेल? चला तर या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…
भारतीय संघ साखळी फेरी ते उपांत्य सामन्यात अजिंक्य राहिला आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघ साखळी फेरीतील दोन सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाला होता. रिपोर्टनुसार, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या अंतिम सामन्यावर पावसाचे किंवा इत कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा प्रभाव पडण्याची शक्यता नाहीये. तरीही जर खराब हवामानामुळे सामन्यावर प्रभाव पडला, तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशीही जर सामना झाला नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला विश्वचषक 2023 स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित केले जाईल. तसेच, जर विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटला, तर विजयी संघाचा निकाल सुपर ओव्हरमध्ये केला जाईल.
विजेत्याचा निकाल लागेपर्यंत होणार सुपर ओव्हर
सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांमध्ये एक-एक षटकाचा सामना खेळला जाईल. जर अशा स्थितीत सुपर ओव्हरमध्येही निकाल लागला नाही, तर आणखी एक सुपर ओव्हर खेळली जाईल. सुपर ओव्हर तोपर्यंत खेळवली जाऊ शकते, जोपर्यंत कोणताही एक संघ विजेता बनत नाही. आता क्रिकेटप्रेमींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे की, यावेळी बाऊंड्री काऊंटचा नियम लागू नसेल का? खरं तर, याच आधारावर 2019 विश्वचषक विजेत्या संघाचा निर्णय झाला होता. 2019चा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळला गेला होता, ज्याचा अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. त्यानंतर बाऊंड्री काऊंट नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित केले होते.
आयसीसीने ‘हे’ नियम केले रद्द
सन 2019 विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर विजेत्या संघाचा निर्णय करण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली गेली होती. सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. त्यानंतर बाऊंड्री काऊंट म्हणजेच सर्वाधिक चौकार-षटकार मारणाऱ्या संघाला विजयी घोषित केले गेले होते. या आधारावर इंग्लंड संघ पहिल्यांदा विश्वचषक विजेता बनला होता. अशाप्रकारचा एक सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 2007 सालच्या टी20 विश्वचषकातही खेळला गेला होता. हा सामनाही बरोबरीत सुटला होता. त्यानंतर विजेत्या संघाचा निर्णय बॉल आऊट नियमाच्या आधारे लावला होता. मात्र, आयसीसीने वादानंतर हे नियम रद्द करून टाकले. (ind vs aus icc cricket world cup 2023 final if india australia final match tied rules of super over boundary count and ball out read here)
हेही वाचा-
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल