---Advertisement---

वर्ल्डकपपूर्वी युवराजचे विचार करायला भाग पाडणारे विधान; म्हणाला, ‘रोहित चांगला कर्णधार, पण…’

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 12:24 PM
Yuvraj-Singh-And-Rohit-Sharma
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता जवळपास 2 महिन्यांहून कमी काळ उरला आहे. यावेळी विश्वचषकाच्या कुंभमेळ्याचे आयोजन भारतात होणार आहे. विश्वचकापूर्वी अनेक क्रिकेट जाणकार आणि माजी क्रिकेटपटूंनी आपापली मते मांडायला सुरुवात केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. 2011च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग राहिलेल्या युवराज सिंगने रोहित शर्माबद्दल वक्तव्य केले. यासोबतच त्याने बीसीसीआयकडे अनोखी मागणीही केली आहे, ज्याची जगभरात चर्चा रंगली आहे.

युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला की, रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे, पण तुम्हाला त्याला चांगला संघ द्यावा लागेल. युवराजने 2011मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराबाबत म्हटले की, एमएस धोनी हादेखील चांगला कर्णधार होता, पण त्याच्याकडे अनुभवी खेळाडूंचा चांगला संघही होता.

याव्यतिरिक्त युवराज सिंग रोहित शर्मा (Yuvraj Singh On Rohit Sharma) याची प्रशंसा करताना म्हणाला की, “मला वाटते की, रोहित खूप चांगला कर्णधार बनला आहे. कारण, त्याने आयपीएलमध्ये दीर्घ काळ मुंबईचे नेतृत्व केले आहे. तो दबावात खूप समंजस्य व्यक्ती आहे. तुम्हाला एका समंजस्य कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, जो अनुभवीही असेल. एमएस धोनी एक चांगला कर्णधार होता, पण त्याला एक चांगला संघही मिळाला होता.”

विशेष म्हणजे, 2011 विश्वचषकात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग यांसारखे अनेक स्टार खेळाडू होते. मात्र, सध्याच्या काळात भारतीय संघाकडे मोहम्मद शमी, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांसारखे काही खेळाडू आहेत, जे 2019च्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते. याव्यतिरिक्त संघात असे युवा खेळाडूही आहेत, जे एकट्याच्या जोरावर सामना जिंकवण्याची क्षमता बाळगतात. मात्र, मागील काही काळापासून भारतीय संघ राहुल, बुमराह आणि श्रेयस अय्यर यांच्याशिवाय खेळत आहे. हे खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. मात्र, विश्वचषकापर्यंत या खेळाडूंच्या पुनरागमनाविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. (world cup 2023 former cricketer yuvraj singh praised rohit sharma for his captaincy and asked bcci this read here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘मला बाबरसोबत लग्न करायचं आहे’, माजी पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने माजली खळबळ
बिग ब्रेकिंग! विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडने निवडला वनडे संघ, दिग्गज खेळाडूंचे कमबॅक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---