भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने फक्त बॅटच नाही, तर चेंडूतूनही कमाल केली. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराटने आधी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. यामुळे तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्यानंतर नेदरलँड्सच्या डावात थेट कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याचीच विकेट काढली. अशाप्रकारे विराटने 9 वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये विकेट घेतली. याचा जल्लोष कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबतच संपूर्ण भारतीय संघाने केला. विशेष म्हणजे, विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हिने स्टेडिअममध्ये जल्लोष केला.
विराटने 9 वर्षांनी घेतली विकेट
विराट कोहली (Virat Kohli) याने नेदरलँड्स संघाच्या डावातील 25व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याला तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, विराटने टाकलेला चेंडू इतका खास नव्हता, पण एवडवर्ड्स खराब शॉट खेळून यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हातून झेलबाद झाला. त्याला यावेळी 30 चेंडूत 17 धावा करून तंबूचा रस्ता पकडावा लागला.
रोहित-अनुष्काने केला जल्लोष
विराटने विकेट घेताच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत संपूर्ण भारतीय संघाने जल्लोष केला. विशेष म्हणजे, 9 वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये विकेट घेऊन विराटही खुश झाला. यापूर्वी विराटने 2014मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 1 विकेट घेतली होती.
या विकेटवर स्टेडिअममध्ये बसलेली विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा (Virat Kohli’s Wife Anushka Sharma) हीदेखील जल्लोष करताना दिसली. विराटने विकेट घेतल्यानंतर अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्याकडे इशारा करताना दिसला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Anushka Sharma couldn't stop herself after Virat Kohli took the wicket. pic.twitter.com/5V6SlVuvji
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
The celebration of Virat Kohli and Anushka Sharma. pic.twitter.com/blgPB9ciql
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
https://www.instagram.com/p/CzjLZXhPwRt/
विराटने केली सचिनची बरोबरी
विराट कोहली याने वनडे विश्वचषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची बरोबरी केली. सचिनने 2003मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात 7 वेळा 50हून अधिक धावा केल्या होत्या. तसेच, विराटनेही या विश्वचषक 2023 स्पर्धेत 7 अर्धशतके झळकावली आहेत. नेदरलँड्सविरुद्ध विराटने 56 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, शाकिब अल हसन यानेही 2019 विश्वचषकामध्ये 7 वेळा 50 हून अधिक धावा केल्या होत्या. (world cup 2023 ind vs ned virat kohli took wicket in odi after 9 years wife anushka sharma reaction video viral)
हेही वाचा-
आपल्या गोलंदाजीने वर्ल्डकप 2023 गाजवणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय; पाहा यादी
Top 5: सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटचे वर्चस्व, यादीत रोहितही सामील; सगळेच खेळणार Semi Final