मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. या सामन्यातील खेळपट्टीविषयी मोठी बातमी समोर येत आहे. उपांत्य सामन्यासाठी वानखेडे स्टेडिअमची खेळपट्ट संथ असेल, असे बोलले जात आहे. संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या पीच क्यूरेटरला वानखेडे स्टेडिअमच्या खेळपट्टीवरून गवत काढण्यास सांगितले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, थिंक टँकने बंगळुरूत नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या (Wankhede Stadium) क्यूरेटरला आपल्या प्राथमिकतेविषयी सूचना दिल्या होत्या. बीसीसीआयच्या स्थानिक क्यूरेटरने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेदरम्यान देशभरातील खेळपट्ट्यांची देखरेख करण्यासाठी एका स्थानिक समूहाची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीनेही प्रत्येक सामन्यासाठी ठिकाणावर आपली तज्ज्ञ माणसं पाठवली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की, भारतीय संघ मुंबईत पोहोचण्यापूर्वी एक संथ खेळपट्टी तयार करण्याचा संदेश देण्यात आला होता.
वळणाऱ्या नाही, तर संथ खेळपट्टी
एका सूत्राने सांगितले की, “ही खेळपट्टी वळणारी नसेल, पण संघाने संथ खेळपट्टीची मागणी केली होती. हेच मुख्य कारण होते की, आम्ही खेळपट्टीवरील गवत काढले आहे.” भारतीय संघाने मागील काही वर्षात घरच्या मैदानावर संथ खेळपट्टीवर चांगले प्रदर्शन केले आहे. विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापनाने आपले सामने संथ खेळपट्टीवर खेळवण्याची विनंती केली होती.
वानखेडे स्टेडिअममध्ये आव्हान
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) यांनी मंगळवारी (दि. 14 नोव्हेंबर) खेळपट्टी चांगल्याप्रकारे पाहिली. नंतर संघ व्यवस्थापनाने ग्राऊंड स्टाफसोबत चर्चा केली आणि विचारले की, ते सराव सत्रानंतर अँटी ड्यू केमिकलची (दव विरोधी रसायन) फवारणी करतील का? स्पर्धेदरम्यान वानखेडे स्टेडिअममध्ये आव्हानाचा पाठलाग करणे कठीण राहिले आहे. आतापर्यंत फक्त 4 सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवता आला आहे. यामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ग्लेन मॅक्सवेल याच्या खेळीचाही समावेश आहे.
Rohit had a close look at the pitch for tomorrow's semi final 👀@ImRo45 pic.twitter.com/D6JiNTBP1j
— Rohit Sharma Trends™ (@TrendsRohit) November 14, 2023
नाणेफेकीविषयी रोहितचे मोठे विधान
नाणेफेकीविषयी विचारले असता रोहित म्हणाला की, “मी इथे खूप क्रिकेट खेळलो आहे. मागील 4-5 सामने मला याबाबत सांगणार नाहीत की, वानखेडेत काय आहे? मी निश्चितरीत्या मानतो की, नाणेफेकीमुळे सामन्याच्या निकालावर मोठा फरक पडेल.”
रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितने कर्णधारासोबतच खेळाडू म्हणूनही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 9 सामन्यात 55.89च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. अशात रोहितकडून संघाला उपांत्य सामन्यातही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल. (world cup 2023 ind vs nz semi final wankhede pitch report read here)
हेही वाचा-
World-cup Semifinal: टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टेन्शनमध्ये, पाहा कुणी केलाय दावा
World-cup Semifinal: टॅास जिंकल्यावर ‘हाच’ निर्णय घ्या, गावसकरांचा रोहितला सल्ला