---Advertisement---

‘हे कठीण असेल, पण आमचे ध्येय…’, बांगलादेशच्या नांग्या ठेचल्यानंतर नेदरलँड्सच्या कॅप्टनचे मोठे विधान

Scott Edwards
---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेत उलटफेर करत असलेल्या संघामध्ये नेदरलँड्स संघाचाही समावेश आहे. आधी बलाढ्य दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेशचा पराभव केला. कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानात पार पडलेल्या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशविरुद्ध 87 धावांनी शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरलेला कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले, जे संघासाठी फायदेशीर ठरले. या विजयानंतर स्कॉट काय म्हणाला जाणून घेऊयात.

या सामन्यात नेदरलँड्स (Netherlands) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात सर्व विकेट्स गमावत 229 धावा केल्या. यावेळी नेदरलँड्सकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने सर्वाधिक 68 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त वेसली बॅरेसीने 41 आणि सीब्रँड एंजेलब्रेचने 35 धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा डाव 42.2 षटकात 142 धावांवर संपुष्टात आला. नेदरलँड्सकडून पॉल व्हॅन मीकेरेन चमकला. त्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे हा सामना नेदरलँड्सने 87 धावांनी जिंकला.

काय म्हणाला कर्णधार?
या ऐतिहासिक विजयानंतर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, ‘आम्ही उपांत्य सामन्यात पोहोचू शकतो.’ तो म्हणाला, “एकूणच आमच्यासोबत सर्व चांगले होत आहे. मी काही खेळाडूंशी बोलत होतो आणि आम्ही विचार केला की, जर आम्ही 220 पेक्षा जास्त धावांच्या जवळपास पोहोचू शकतो, तर आपल्याकडे झुंज देण्याची एक संधी असेल. गोलंदाजांनी कमाल केली. आर्यन, कॉलिन, बास आणि मीकेरेन प्रत्येकजण आपले काम करत आहे.”

‘आम्ही उपांत्य सामन्यात पोहोचू शकतो’
पुढे बोलताना एडवर्ड्स म्हणाला, “नेदरलँड्स संघात क्रिकेट सुधारत आहे. आम्ही मागील 18 महिने चांगले सामने खेळले आहेत. आम्हाला याचे निकालही मिळाले आहेत. आम्ही सुरुवातीलाच चर्चा केली होती की, ही स्पर्धा आम्हाला उपांत्य सामन्यातही संधी देऊ शकते. हे आमचे ध्येय राहिले आहे, पण आमच्यापुढे काही कठीण सामने आहेत.”

नेदरलँड्सचा पुढील सामना
नेदरलँड्स संघ या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी पोहोचला आहे. आता त्यांचे 4 गुण झाले आहेत. त्यांचा पुढील सामना 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. (world cup 2023 netherlands captain scott edwards statement after win match against bangladesh ban vs ned )

हेही वाचा-
अर्रर्र! विजय मिळवूनही ऑस्ट्रेलियाला हलवता आले नाही न्यूझीलंडचे सिंहासन, पण का? पाहा Points Table
CWC23 : सलग चौथा सामना जिंकल्यानंतर काय होत्या कमिन्सच्या भावना? म्हणाला, ‘विरोधी संघाने आम्हाला…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---