बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ आमने सामने असणार आहे. शनिवारच्या डबल हेडरमधील हा पहिला सामना असून सकाळी 10.30 वाजता ही लढत सुरू होईल. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठीची स्पर्धा लक्षात घेता दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. अशात खेळपट्टी कोणत्या संघाला साथ देणार हे महत्वाचे ठरेल.
शुक्रवारी (3 नोव्हेंबर) अफगाणिस्तानने नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळाला. पाचव्या क्रमांकावर असणारा पाकिस्तान संघ खाली घसरून सहाव्या क्रमांकावर आला आणि अफगाणिस्तान पाचव्या क्रमांकावर पोहोचला. अशात उपांत्य सामन्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला गुणतालिकेत पुन्हा आघाडी घ्यावी लागेल. दुसरीकडे न्यूझीलंड संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य सामन्यातील स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंडलाही पुढचा प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे.
पाकिस्तानने विश्वचषकाच्या चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. अशात बेंगलोरमध्ये होणारा दोन्ही संघांचा आठवा सामना निर्णायक ठरू शकतो. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बहुतांश वेळा फलंदाजांना मदत मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. याठिकाणी अनेक हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. असे असले तरी, खेळपट्टी सुरुवातील वेगवान गोलंदाजीसाठी फायदेशीर ठरते. खेळ जसजसा पुढे जाईल, तशी फलंदाजांना मिळणारी मदत वाढते. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजही कमाल दाखवू शकतात. सीमारेषा जास्त लांब नसल्यामुळे चौकार षटकार सहजासहजी मारले जातात. याठिकाणी शेवटचा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता. आफ्रिकी संघाने या सामन्यात 271 धावांचे लक्ष्य गाठले होते.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत 28 वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यातील 12 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर 13 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे. 383 ही याठिकाणी एखाद्या वनडे सामन्यात बनलेली सर्वात्तम धावसंख्या आहे. भारतीय संघाने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही धावसंख्या केली होती.
दरम्यान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघां आतापर्यंत 115 वनडे सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यातील 60 सामने पाकिस्तानने, तर 51 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, कायल जेमिन्सन, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान – अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, आघा सलमान, मोहम्मद वसीम, उसामा मीर, शाहीन अफरीदी, हॅरिस रौफ.
(World Cup 2023 Pakistan vs New Zealand match preview )
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! ‘या’ तारखेला खेळाडूंवर पाडला जाणार पैशांचा पाऊस, आयपीएल लिलिवाची तारीख निश्चित
स्टोक्सच्या गुडघ्यावर होणार सर्जरी, तब्बल ‘एवढ्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर