पाकिस्तान आणि नेदर्लंड हे दोन्ही संघ शुक्रवारी (6 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 मधील आपला पहिला सामना खेळत आहेत. पाकिस्तानसाठी सामन्याची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज मोहम्दम रिझवान आणि सौद शकिल यांनी पाकिस्तानचा डाव सावरला आणि संघाला सुस्थितीत पोहोचवले.
उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक नेदर्लंडने जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून आयर्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीचा फायदा मिळाला. पाकिस्तानच्या पहिल्या तीन विकेट्स संघाची धावसंख्या 38 असताना गमावल्या. यात फखर झमान (Fakhar Zaman), ईमाम-उल-हक (Imam ul Haq) आणि बाबर आझम (Babar Azam) या तीन महत्वाच्या फलंदाजांचा समावेश होता. पाकिस्तानसाठी सामन्याची सुरुवात अपेक्षित पद्धतीने झाली नाही. मात्र, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि सौद शकील (Saud Shakeel) यांनी संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली.
रिझवान (Mohammad Rizwan) आणि शकील (Saud Shakeel) यांच्यात 114 चेंडूत 120 धावांची भागीदारी पार पडली. शकील 52 चेंडूत वैयक्तिक 68 धावा करून बाद झाल्यामुळे ही भागीदारी पुढे जाऊ शकली नाही. तत्पूर्वी रिझवानने 58 चेंडूत, तर शखीलने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक केले. पाकिस्तानने आपली चौथी विकेट संघाची धावसंख्या 158 धावा होती.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन – इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
नेदरलँड्सची प्लेइंग इलेव्हन – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीड, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार
विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने जिंकला टॉस; बाबर म्हणाला, ‘आम्ही आज 300…’