---Advertisement---

पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच भारताने हलवलं न्यूझीलंडचं सिंहासन, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टाका नजर

Team-India
---Advertisement---

World Cup 2023 Points Table: शनिवार (दि. 14 ऑक्टोबर) हा दिवस 140 कोटी भारतीयांसाठी खूपच खास ठरला. या दिवशी विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने दारुण पराभव केला. या विजयासह भारतीय संघ विश्वचषकाच्या पॉईंट्स टेबलमध्ये थेट अव्वलस्थानी पोहोचला आहे.

भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यात जबरदस्त विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताचे 6 गुण झाले आहेत. मात्र, न्यूझीलंड संघानेही 3 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटच्या आधारे भारतीय संघ (Team India) गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज करण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरला. भारत आणि न्यूझीलंडनंतर तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. त्यांचे 2 सामन्यात 2 विजयासह 4 गुण आहेत.

पाकिस्तानचा नेट रनरेट खूपच खराब
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा नेट रनरेट +1.821 इतका आहे, तर न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.604 इतका आहे. मात्र, या पराभवानंतर बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ चौथ्या स्थानी आहे. त्यांनी 3 सामन्यात 2 विजय आणि 1 पराभवासह 4 गुण मिळवले आहेत. त्यांचा नेट रनरेट -0.137 इतका आहे. अशाप्रकारे भारतीय संघाविरुद्ध दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट खूपच खराब झाला आहे. पाकिस्ताननंतर गुणतालिकेत इंग्लंड संघाचा पाचवा क्रमांक लागतो.

https://twitter.com/NJayanda/status/1713406027734114394

इतर संघांची स्थिती
इंग्लंड संघाला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दुसरा सामना जिंकला. अशाप्रकारे इंग्लंड संघाचे 2 सामन्यात 2 गुण आहेत. तसेच, बांगलादेश संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. त्यांचे 3 सामन्यात 2 गुण आहेत. त्यानंतर श्रीलंका, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. या संघांना स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. (world cup 2023 points table after india vs pakistan match know here where all teams stands)

हेही वाचा-
हिटमॅन थांबत नसतोय! 86 धावांच्या स्फोटक खेळीत बनवले तब्बल 11 रेकॉर्ड्स
BREAKING: कर्णधार शनाका विश्वचषकातून बाहेर! ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---