---Advertisement---

नादच खुळा! झिम्बाब्वेच्या खेळाडूने सलग 5 सामन्यात पाडला 500+ धावांचा पाऊस, विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री

On: शुक्रवार, जून 30, 2023 3:45 PM
Sean-Williams
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप 4 महिन्यांचा का कालावधी बाकी आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहेत. 8 संघ आधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ पात्रता फेरी खेळून प्रवेश मिळवतील. क्वालिफायर फेरीत झिम्बाब्वे संघ शानदार प्रदर्शन करत आहे. संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. झिम्बाब्वे संघ अ गटात गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. संघाच्या या विजयामागे सीन विलियम्स याचा मोलाची भूमिका आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहली याच्या विक्रमाच्या खास यादीत स्थान मिळवले आहे.

झिम्बाब्वे संघाचा 36 वर्षीय फलंदाज सीन विलियम्स (Sean Williams) याने सलग 5 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अव्वलस्थानी आहे. विलियम्सने सलग 5 सामन्यात 532 धावा केल्या आहेत. तर विराटने 108.56च्या स्ट्राईक रेटने 596 धावा केल्या आहेत. विलियम्सने यासोबतच 60 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस पाडला आहे. या बाबतीत पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 537 धावा केल्या आहेत.

याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडन आहे. त्याने सलग 5 सामन्यात 529 धावा केल्या आहेत. यादीत पाचव्या स्थानी पाकिस्तानी खेळाडू फखर जमान आहे. त्याने 515 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे, सीन विलियम्स हा स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याने क्वालिफायर फेरीत 3 शतके झळकावली आहेत. झिम्बाब्वे संघाविषयी बोलायचं झालं, तर संघाने शानदार प्रदर्शन करत चारही सामन्यात विजय नोंदवला आहे. झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात नेपाळला 8 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला 35 धावांनी पराभूत केले होते. चौथ्या सामन्यात युनायटेड स्टे्सविरुद्ध 304 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर सुपर 6 फेरीत ओमान संघालाही झिम्बाब्वेने 14 धावांनी पराभूत केले होते.

आता झिम्बाब्वे संघ श्रीलंका आणि स्कॉटलँडविरुद्ध सामना खेळेल. दुसरीकडे, श्रीलंका संघ ब गटातील गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. (world cup 2023 qualifier zimbabwe sean williams most runs in 5 consecutive odi innings)

महत्वाच्या बातम्या-
‘विराट गाजवणार 2023चा World Cup’, विंडीजच्या दिग्गजाची भविष्यवाणी, भारताबद्दल म्हणाला…
‘अरे भावा, कुठल्या लाईनमध्ये घुसलास तू?’, रहाणेच्या लेटेस्ट व्हिडिओवर चाहत्याची कमेंट, पत्नीही म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---